भुसावळातील ब्राह्मण संघात कराष्टमी : जागतिक रंगमंच दिन व कोजागिरी साजरी


Karashtami in Bhusawal Brahmin Sangh : World Theater Day and Kojagiri celebrations भुसावळ : शहरातील ब्राह्मण संघात कोजागिरी पौर्णिमेचा उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी कराष्टमी, जागतिक रंगमंच दिन व कोजागिरी असा त्रिवेणी दुग्ध शर्करा योग जुळून आला. ब्राह्मण संघ व स्वरनिनाद सांस्कृतिक मंच यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम आयोजित करण्यात आला. ज्येष्ठ सुरेश कुलकर्णी, ब्राह्मण संघाचे अध्यक्ष विजय जोशी, सहसचिव आमोद टेंभुर्णीकर, दिपक पाथरकर व रंगकर्मी रमाकांत भालेराव, मनोज कुलकर्णी यांच्या हस्ते श्री गणेश व नटराज पूजन करण्यात आले. यावेळी ब्राह्मण संघाचे अध्यक्ष विजय जोशी यांनी मनोगत व्यक्त केले. शतक महोत्सवी वर्षात कोणत्या कार्यक्रमांचे आयोजन करावे यासाठी समाज बांधवांचे सहकार्य अपेक्षित असल्याचे ते म्हणाले.

सुश्राव्य गीतांनी श्रोते मंत्रमुग्ध
स्वरनिनाद सांस्कृतिक मंचाचे प्रमुख मनोज कुलकर्णी, किरण सोहळे व सर्व सहकायांचे भगवान श्री परशुरामाची प्रतिमा व गुलाबपुष्प देवून स्वागत करण्यात आले. स्वरनिनाद सांस्कृतिक मंच कलाकारांनी सुमारे दोन तास सुश्राव्य गीतांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. सूत्रसंचलन श्रीकांत जोशी यांनी केले. यशस्वीतेसाठी संघाचे अध्यक्ष विजय जोशी, सहसचिव आमोद टेंभुर्णीकर, कोषाध्यक्ष प्रसन्न गंधे, शंतनु गचके, सुधीर देशपांडे, संजय खोचरे, हेमंत भोकरडोळे यांनी परीश्रम घेतले.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !