वाघळीतील तरुणाचा भरधाव कंटेनरच्या धडकेने मृत्यू
A young man from Waghli died after being hit by a speeding container चाळीसगाव : चाळीसगाव तालुक्यातील वाघळी येथील 39 वर्षीय तरुणाचा कंटेनरच्या धडकेने मृत्यू झाला. हा अपघात सोमवारी रात्री तालुक्यातील वाघळी गावाजवळ घडला. रोहिदास शंकर दांडगे (धनगर, 39) असे मयताचे नाव आहे.
दिवाळी सणावर दुःखाचे सावट
चाळीसगाव तालुक्यातील वाघळी येथील रोहिदास शंकर दांडगे (धनगर, 39) यांना भरधाव कंटेनर (क्रमांक डी.डी. 01 एच.9484) ने जोरदार धडक दिल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. हा अपघाात जळगाव-चाळीसगाव महामार्गावरील वाघळी गावाजवळ सोमवारी रात्री 9.30 वाजेच्या सुमारास घडला. अपघातानंतर स्थानिक नागरीकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. दिवाळीच्या दिवशी झालेल्या अपघातामुळे गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मयत रोहिदास शंकर लांडगे (धनगर) यांच्या पश्चात्य सहा वर्षांचा लहान मुलगा, मुलगी, पत्नी असा परिवार आहे.

