कोळवद येथे फटाके फोडण्यास मनाई केल्याचे वाईट वाटून 21 वर्षीय तरुणाला चौघांची मारहाण


यावल : यावल तालुक्यातील कोळवद येथील ग्रामपंचायत कार्यालया शेजारील पाण्याच्या कुंडाजवळ काही जण फटाके फोडत असताना त्यांना तेथे फटाके फोडण्यास मनाई केल्याच्या कारणावरून 21 वर्षीय तरुणाला चौघांनी शिवीगाळ करीत मारहाण केली व दुखापत केली. याप्रकरणी यावल पोलिसात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

चौघांविरोधात गुन्हा दाखल
कोळवद, ता.यावल या गावात ग्रामपंचायत कार्यालयाजवळ पाण्याचेकुंड आहे. या कुंडाजवळ पिंटू पाटील, विलास पाटील, विशाल पाटील व योगेश पाटील (सर्व राहणार कोळवद) हे फटाके फोडत होते. येथे फटाके फोडू नका, असे त्यांना शुभम राहुल इंधाटे याने सांगितले. या तरुणाने फटाके फोडण्यास मनाई केल्याचे वाईट वाटून या चौघांनी हातातील दगड मारून दुखापत केली तर इतरांनी त्याला चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली. याप्रकरणी यावल पोलिसात शुभम इंधाटे यांच्या फिर्यादीवरून चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार विजय पाचपोळ करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !