डांभूर्णी येथे फटाक्याच्या ठिणगीने जळला कापूस
Cotton burnt by firecracker spark at Dambhurni डांभूर्णी, ता.यावल : फटाक्याचे ठिणगी पडल्याने साठवणू केलेल्या कापसाच्या गंजीला आग लागल्याची घटना गावात घडली. शेतकरी जोती पाटील यांनी आपल्या शेतातील कापूस भाडेतत्वावर घेतलेल्या खोलीत भरल्यानंतर खोलीच्या खिडक्या खुल्या राहिल्याने फटाक्याची ठिणगी पडल्यामुळे कापूस जळाला.
अंदाजे पाच ते सहा क्विंटल कापसाचे नुकसान झाले आहे. आगीचा प्रकार लक्षात आल्यानंतर ग्रामस्थांनी पाण्याचा मारा करीत आग विझवली. खोलीत दरवाजे, खिडक्या, सरे, खांब हे लाकडाचे होते तर शेजारीच आजूबाजूला रहिवासी घरे असल्याने मोठा अनर्थ वेळीच आगीवर नियंत्रण मिळाल्याने टळला. ही घटना नैसर्गिक नसल्याने वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे आम्ही माहिती पाठवणार असल्याचे संबधित तलाठी व शिंदे यांनी सांगितले.

