न्हावी येथे धार्मिक स्थळाच्या पायरीवर फटाके फोडले : तिघांविरुद्ध गुन्हा


Bursting firecrackers on the steps of a religious place in Nahavi : Crime against three यावल : यावल तालुक्यातील न्हावी येथील धार्मिक स्थळाच्या पायरीवर गावातील तिघांनी फटाके फोडून धार्मिक भावना दुखावल्याने फैजपूर पोलिसात तीन जणांविरुद्ध धार्मिक भावना दुखावल्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

तिघांविरोधात गुन्हा दाखल
न्हावी येथील एका धार्मिक स्थळाजवळ सुधीर एकनाथ पाटील (राधे राधे चौक, न्हावी), छोटू दत्तू पाटील (विठ्ठल मंदिराजवळ, न्हावी) व पंकज कांचन कोळी (कोळीवाडा, न्हावी) या तिघांनी धार्मिक स्थळाच्या थेट पायरीवरचं फटाके फोडून एका धर्माच्या धार्मिक भावना दुचाावल्या आणि श्रद्धा स्थळाचा अपमान केला. या प्रकरणी फैजपूर पोलिसात तीन जणांविरुद्ध धार्मिक भावना दुखावण्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास फैजपूरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक निलेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार देविदास सुरदास करीत आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !