भुसावळ शहरात आगीत पल्सर दुचाकी खाक
Pulsar two-wheeler destroyed in fire in Bhusawal city भुसावळ : शहरातील आगाखान वाडा भागात पल्सर दुचाकीला अचानक आग लागल्याने दुचाकी खाक झाल्याची घटना शनिवार, 18 रोजी दिड ते तीन वाजेदरम्यान घडली. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली.
ईमरान शेख सईद कुरेशी (30, आगाखान वाडा, भुसावळ) यांच्या तक्रारीनुसार, घराबाहेर उभ्या असलेल्या पल्सर दुचाकीला तांत्रिक बिघाड व शॉर्ट सर्किटने आग लागल्याची घटना शनिवारी दिड ते तीन वाजेदरम्यान घडली. आगीमुळे पूर्ण पल्सर जळाल्याने मोठे नुकसान झाले. तपास हवालदार जितेंद्र पाटील करीत आहेत.


