भरधाव कारच्या धडकेने कुर्हेपानाचे गावात दुचाकीस्वार जखमी : दुचाकीचे नुकसान
Bike rider injured in Kurhepanache village hit by speeding car : Bike damaged भुसावळ : भरधाव कारने उडवल्याने दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना कुर्हेपानाचे येथील चौफुलीवर 16 रोजी सकाळी सात वाजता घडली. अपघातानंतर कार चालक पसार झाला. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलिसात कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
चारचाकी चालकाविरोधात गुन्हा दाखल
रवींद्र निनाजी वानखेडे (पोलिस कॉलनी, शिवधाम मंदिराजवळ, जळगाव) यांच्या फिर्यादीनुसार, ते दुचाकी (एम.एच.19 बी.आर.1354) ने मलकापूर ते जळगाव प्रवास करीत असताना भरधाव कार (एम.एच.19 डीव्ही 0483) वरील चालकाने कुर्हेपानाचे चौफुलीवर जोरदार धडक दिल्याने उजव्या पायाच्या गुडख्याखाली जखम झाली तसेच दुचाकीचे नुकसान झाले. अपघातानंतर कारचालक पसार झाला. हा अपघात 16 नोव्हेंबर रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास घडला. वानखेडे यांच्या तक्रारीवरून वरील कार चालकाविरोधात भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक बबन जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली नाईक कैलास अशोक बाविस्कर करीत आहेत.


