डांभूर्णी शेत शिवारातून राज्य विद्युत वितरण कंपनीचे 35 हजार रुपये किंमतीचे तार लांबवले
State Electricity Distribution Company’s wire costing Rs. 35 thousand was extended from Dambhurni Shet Shivar यावल : यावल तालुक्यातील डांभूर्णी शेत-शिवारातील राज्य विद्युत वितरण कंपनीच्या रोहित्रावरून शेतकर्यांना वीजपुरवठा करण्यासाठी टाकण्यात आलेल्या खांबावरील दोन हजार 160 मीटर लांबीचे व 35 हजार रुपये किंमतीचे वीज तार चोरट्यांनी लांबवले. याप्रकरणी यावल पोलिसात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
वीजपुरवठा ठप्प शेतकर्यांचे हाल
डांभूर्णी, ता.यावल या शेत-शिवारात नितीन वराडे यांच्या शेतात राज्य विद्युत कंपनीचे ट्रान्सफार्मर आहे. या ट्रान्सफार्मरपासून देवानंद फालक, सुरेश भंगाळे व नितीन पाटील यांच्या शेतापर्यंत वीजपुरवठा करण्यासाठी विद्युत खांब टाकून त्यावर तार टाकण्यात आले होते. दरम्यान मध्यरात्रीनंतर महावितरण कंपनीचे हे विद्युत तार अज्ञात चोरट्यांनी चोरी केले. दोन हजार 160 मीटर लांबीचे 35 हजार रुपये किंमतीचे तार चोरी झाल्याचे सकाळी उघडकीस आले. शेतकर्यांनी हा प्रकार राज्य विद्युत वितरण कंपनीच्या अभियंत्यांना कळवल्यानंतर त्यांनी घटनास्थळी पाहणी केली आणि यावल पोलिसात वरीष्ठ तंत्रज्ञ सुदर्शन पाटील यांच्या फिर्यादीवरून अद्यात चोरट्यांविरुद्ध वीज तार चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार नरेंद्र बागुले करीत आहे.


