ज्यांच्याकडे डिग्री नाही तेच आता रहिवासाचे मागतायेत पुरावे


लोकसंघर्षच्या प्रतिभा शिंदे : भुसावळात संविधान बचावो समितीची सभा

भुसावळ : आमच्या मुलांवर 353 व 307 कलमान्वये गुन्हे दाखल झाले मात्र अजून ती जेल तयार नाही झाली जेथे आम्हाला तुम्ही टाकू शकाल, असे सांगत लोकसंघर्षच्या प्रतिभा शिंदे म्हणाल्या की, तुमच्या लोकांनी 11 वेळा माफी मागून प्रति महिना 60 रुपये पेन्शन घेतल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यपद्धत्तीवर त्यांनी टिकास्त्र सोडले. ज्यांच्याकडे स्वतःची डिग्री नाही ते आम्हाला पुरावा मागत असून मोदींनी रेल्वेचे खाजगीकरण अंबानी-अदानींसाठी केल्याचा त्यांनी आरोप केला. उमर खालीद यांना जिल्ह्यात येवू देण्यास परवानगी नाकारण्यात आल्याच्या बाबीवर टिका करीत आरएसएसचे कितीही लोक येवू द्या, आपण डगमगणार नाही, असे सांगत त्यांनी लोकतंत्रात विरोध करण्याचा प्रत्येकाला अधिकार असून आंदोलन वाढवण्याची गरज असल्याचे त्या भुसावळातील संविधान बचावो समितीच्या शनिवारी झालेल्या सभेत म्हणाल्या.

कुठल्या एका धर्माचा हा विषय नाही -करीम सालार
करीम सालार म्हणाले की, हा कुठल्याही एका धर्माचा विषय नाही. आसाममध्ये भाजपाची सत्ता असतानाही सीएएला प्रचंड विरोध झाला. राज्यात सीएए लागू होणार नसल्याची ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्याने त्यांचे आपण आभारी असल्याचे ते म्हणाले. समन्वयक मुकुंद सपकाळे म्हणाले की, आर्टीकल 14 व 15 चे उल्लंघण झाले असून लोक रस्त्यावर आल्यानंतरही पंतप्रधान दखल घेत नसल्याचे दुर्दैव आहे. एनआरसीसाठी आजोबा-वडिलांचा दाखला लागणार असून तो शहा-मोदींकडे तरी आहे का? असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला.



यांची विचार मंचावर उपस्थिती
विचार मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार संतोष चौधरी, प्रमुख वक्ता योगेंद्र यादव, लोकसंघर्षच्या प्रतिभा शिंदे, मुकुुंद सपकाळे, गफ्फार मलिक, सचिन धांडे, विनोद देशमुख, मौलाना नूर आलम, आदींची उपस्थिती होती.

सभा यशस्वीतेसाठी यांचे परीश्रम
सभा यशस्वीतेसाठी सलीम चुडीवाले, मुन्वर खान, साबीर शेख, दनिश पटेल, फारूक नजीर, इमरान खान, आबीद भाई, फुरकान अश्रफ कुरेशी, फरहान भाई तसेच संविधान बचावो समितीच्या सदस्यांनी परीश्रम घेतले. दरम्यान, अपर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांनी सभेच्या बंदोबस्ताचा आढावा घेतला. सभास्थळी पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड, बाजारपेठ निरीक्षक दिलीप भागवत, शहरचे बाबासाहेब ठोंबे, तालुक्याचे रामकृष्ण कुंभार यांनी कडेकोट बंदोबस्त लावला होता. सभास्थळी मेटल डिटेक्टरमधून प्रत्येकाची तपासणी केल्यानंतर आत सोडण्यात आले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !