बोदवडला तीन तपानंतर दहावीचे विद्यार्थी आले एकत्र


बोदवड : शहरातील न.हं.राका हायस्कूलमध्ये 1987 मध्ये शिक्षण घेणार्‍या दहावीच्या विद्यार्थ्यांचे गेट टुगेदर ति.र.बरडीया मराठी मुलांच्या शाळेत नुकतेच झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री ति.र.बरडीया शाळेच्या मुख्याध्यापिका काठोके होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून तत्कालीन कार्यरत शिक्षक टी.के.दांदडे, जे.जी.तळेगावकर, पी.डी.तेली, एम.के.हजारी, एम.एस.खंबायत, एन.के.पाटील, दि बोदवड सार्वजनिक को ऑप एज्यू सोसायटी बोदवडचे संचालक मंडळ उपस्थित होते.

प्रास्ताविक एस.पी.पाटील यांनी गीतातून गेट टुगेदरची रूपरेषा मांडली. प्रमुख पाहुण्यांचा सत्कार राजेश समदडीया, प्रमोद कुल्ली, प्रा.गजानन वंजारी, डॉ.प्रेमसिंग पाटील, गजानन तायडे, उल्हास पाटील, अध्यक्षांचा सत्कार वैशाली तळेगावकर यांनी केला. 1987 च्या बॅच मधील आकस्मित निधन झालेल्या विद्यार्थ्यांना व दिवंगत शिक्षकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तब्बल 36 वर्षानंतर गेट टुगेदर कार्यक्रमात 47 विद्यार्थी व तीन विद्यार्थीनी असे एकूण 50 विद्यार्थी एकत्र जमले. उपस्थित माजी विद्यार्थ्यांनी आपापला परिचय करून दिला. परीचयानंतर प्रमुख पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त करून सर्वांना शुभेच्छा व आशिर्वाद दिले.


यांचे मेळावा यशस्वीतेसाठी परीश्रम
1987 बॅचचे माजी विद्यार्थी अनिल पवार, डॉ.प्रेमसिंग पाटील, राजेश समदडीया, नेमीचंद तेली, एस.पी.पाटील, किशोर शेळके, वैशाली तळेगावकर यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन राजेश हजारी यांनी तर आभार डॉ.वसंत माळी यांनी मानले. मेळावा यशस्वीतेसाठी किशोर शेळके, राजेश हजारी, राजेश समदडीया, डॉ.प्रवीण पाटील, जितेंद्र चौधरी, गजानन तायडे, उल्हास पाटील आदींचे सहकार्य लाभले.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !