नाकर्तेपण लपवण्यासाठीच काळा कायद्याचे आणले बिल
माजी आमदार संतोष चौधरी : भुसावळात संविधान बचावो समितीची सभा
भुसावळ : भाजपावाल्यांनी नाकर्तेपण लपवण्यासाठी काळा कायद्याचे बिल आणल्याचा आरोप माजी आमदार संतोष चौधरींनी केला. हा एक प्रकारे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेला हात लावण्याचा प्रयत्न असून ही धर्माची लढाई असल्याने आता सर्वांनी त्यात उतरणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. भुसावळात शनिवारी झालेल्या संविधान बचावो समितीच्या सभेत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
आम्ही मालक, हे तर भाडेकरू -गफ्फार मलिक
आम्ही हिंदूस्तानचे मालक असून हे तर भाडेकरू असल्याची टिका गफ्फार मलिक यांनी मोदी-शहांचे नाव न घेता केली. आमच्याकडून पुरावे काय मागताय तर पूर्वजांच्या कबरीतून अस्थी काढू हवे तर डीएन करा, असेही मलिक म्हणाले.


यांची विचार मंचावर उपस्थिती
विचार मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार संतोष चौधरी, प्रमुख वक्ता योगेंद्र यादव, लोकसंघर्षच्या प्रतिभा शिंदे, मुकुुंद सपकाळे, गफ्फार मलिक, सचिन धांडे, विनोद देशमुख, मौलाना नूर आलम, आदींची उपस्थिती होती.
सभा यशस्वीतेसाठी यांचे परीश्रम
सभा यशस्वीतेसाठी सलीम चुडीवाले, मुन्वर खान, साबीर शेख, दनिश पटेल, फारूक नजीर, इमरान खान, आबीद भाई, फुरकान अश्रफ कुरेशी, फरहान भाई तसेच संविधान बचावो समितीच्या सदस्यांनी परीश्रम घेतले. दरम्यान, अपर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांनी सभेच्या बंदोबस्ताचा आढावा घेतला. सभास्थळी पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड, बाजारपेठ निरीक्षक दिलीप भागवत, शहरचे बाबासाहेब ठोंबे, तालुक्याचे रामकृष्ण कुंभार यांनी कडेकोट बंदोबस्त लावला होता. सभास्थळी मेटल डिटेक्टरमधून प्रत्येकाची तपासणी केल्यानंतर आत सोडण्यात आले.
