भुसावळ ऑर्डनन्सचे 99 टक्के कर्मचारी संपाच्या बाजूने


भुसावळ : भुसावळ ऑर्डनन्समध्ये अनिश्चित काळासाठी संपावर जाण्याबाबत मंगळवारी राबवण्यात आलेल्या मतदान प्रक्रियेत संपाच्या बाजूने 98.63 टक्के कामगारांनी मतदान केल्याने कर्मचार्‍यांचा संप निश्चित मानला जात आहे. आयुध निर्माणीत मंगळवारी सकाळी पाच वाजेपासून प्रशासनाद्वारे घेण्यात आलेल्या मतदानासाठी सर्व कर्मचार्‍यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले.

99 टक्के कामगार संपाच्या बाजूने
ऑर्डनन्स फॅक्टरीत केंद्रीय कर्मचारी महासंघाद्वारे जुनी पेंशन लागू करणेसाठी स्थापित जॉईंट फ्रंट रिस्टोरेशन ऑफ ओल्ड पेन्शन स्कीम व अखिल भारतीय संरक्षण कामगार महासंघाच्या निर्देशानुसार मंगळवारी आयुध निर्माणी कामगार युनियनतर्फे मतदान घेण्यात आले. मतदान प्रक्रियेत 98.63 टक्के कामगारांनी संपाच्या बाजूने कौल दिला. निवडणूक अधिकारी तथा श्रम कल्याण आयुक्त बी.बी.मुजूमदार, श्रम कार्यालयाचे अनुभाग प्रमुख नितीन लोखंडे यांच्या मार्गदर्शनात विवेक स्वामी, राजेश बिसेन, विकास जंगले, नवीन गायकवाड, चंदन कुमार यांनी मतदान प्रक्रिया यशस्वी राबविली. युनियनच्या वतीने जेसीएम सदस्य दिनेश राजगिरे यांच्या नेतृत्वात संपासाठी मतदान यशस्वी करण्यात आले.


यशस्वीतेसाठी यांचे परीश्रम
मतदान प्रक्रियेच्या यशस्वीतेसाठी मिलेश देवराळे, संतोष बाविस्कर, योगेश आंबेडकर, आशिष मोरे, प्रवीण मोरे, निलेश देशमुख, मोहन सपकाळे, किशोर बढे, राजकिरण निकम, प्रवीण बोईत, किशोर पाटील, दीपक भिडे, नाना जैन, हिरालाल परीस्कर, नितीन देशमुख, एन.डी.पाटील, हरीश बाविस्कर यांच्यासह जेसीएम सदस्य विनोद पवार, मजदूर युनियनचे किशोर चौधरी, बहुजन युनियनचे संजय अहिरे, एस.सी.एस.टी.ओबीसी असोसिएशनचे विनोद यांची उपस्थिती होती. दरम्यान, बुधवारी मजदुर यूनियन इंटकद्वारे संपासाठी मतदान घेण्यात येईल.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !