मुक्ताईनगरातील प्रौढाचा हृदयविकाराचा मृत्यू
मुक्ताईनगर : हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने शहरातील 55 वर्षीय प्रौढाचा मृत्यू झाला. गजानन जानकिराम कळसकर (55, रेणुकानगर, मुक्ताईनगर) असे मयताचे नाव आहे.
गजानन कळसकर यांना मंगळवारी हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले असता डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास हवालदार लिलाधर भोई करीत आहेत.


