जुन्या आठवणींना उजाळा : वरणगावात माजी विद्यार्थ्यांचा मेळावा
Bring back old memories : Alumni gathering in Varangaon भुसावळ : 1998 मध्ये इयत्ता दहावीत तर 2000 मध्ये इयत्ता बारावीत शिक्षण घेत असलेल्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा नुकताच वरणगावातील महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित करण्यात आला. जुन्या वर्गातील बेंचवर बसून यावेळी विद्यार्थ्यांनी आठवणींना उजाळा दिला. यावेळी बरेच विद्यार्थी भावूक झाले होते. त्यांना शिकविणार्या शिक्षकांना धन्यवाद देत त्यांचा गौरव करण्यात आला.
अनेक विद्यार्थी शिक्षण घेऊन उच्च शिक्षणाच्या माध्यमातून विविध क्षेत्रात मुंबईत कार्यरत आहेत. पायाभूत शिक्षणात महात्मा गांधी विद्यालयातील शिक्षक व इतर घटकांचा महत्त्वपूर्ण वाटा असल्रूाने दिवाळी सुट्टीनिमित्त सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी एकत्र आले. या ठिकाणी एकमेकांशी ओळख परीचय करत विद्यार्थ्यांनी काळे टी-शर्ट व जीन्स पॅन्ट पोशाख घालत जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी विद्यार्थ्यांनी शिक्षकांचा गौरव केला.


यांची व्यासपीठावर उपस्थिती
अध्यक्षस्थानी विद्यालयाचे माजी शिक्षक आर.आर.पाटील होते. यावेळी माजी प्राचार्य आर.ए.वाघ, जी.एस.एम.बी.माळी, बी.जे.पाटील, एस.जे.नाईक, जयंत जोशी, आर.एस.सोनवणे, सी.एफ.कळस्कर, मुख्याध्यापिका वंदना चव्हाण, पर्यवेक्षक बी.एम.राठोड, सतीश मोरे आदी उपस्थित होते.
एस.जे.नाईक म्हणाले की, मुले कितीही मोठी झाली तरी ती आमच्यासाठी विद्यार्थीच आहेत. आपण जिथे कुठे काम करत असाल तेथे देश हिताचे काम करावे. हा वारसा येणार्या पिढीला द्या, यामुळे देशभक्तीचे बीज आणखी घट्ट होतील. या कार्यक्रमाला जवळपास 80 पेक्षा जास्त विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रशांत चौधरी तर आभार मिलिंद पाटील यांनी मानले.
यशस्वीतेसाठी रुपाली महाजन, नम्रता गडे, कविता जैन, अमोल सराफ, उमेश सोनवणे, रुपेश पाटील, अनंता माळी, दीपक माळी, जगदीश मोरे, प्रशांत चौधरी यांनी परीश्रम घेतले. रूपेश पाटील, प्रशांत चौधरी, अमोल सराफ, उमेश पाटील, योगेश पाटील, जितू मोरे, अनंत माळी, रुपाली महाजन आदींनी परीश्रम घेतले. महात्मा गांधी विद्यालयाच्या अमृत वर्षानिमित्त विविध पर्यावरण पूरक पन्नास झाडे लावून ती जगवण्यासाठी ठिबक नळी टाकण्यात आली व वेळोवेळी येऊन या झाडांचे मशागत केल्याने आज विद्यालयाच्या प्रांगणात पन्नास झाडे डोलाने जगत असल्याचे बघत विद्यार्थ्यांना आनंद झाला.





