नाडगाव उपसरपंचपदी विजय गायकवाड बिनविरोध
Nadgaon Upsarpanchpadi Vijay Gaikwad unopposed बोदवड : बोदवड तालुक्यातील नाडगाव येथे ग्रामपंचायत उपसरपंचपदाची निवडणूक बिनविरोध झाली. सदस्य विजय गायकवाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सरपंच व उपसरपंच यांचा अडीच-अडीच वर्षाचा काळ ठरलेला होता. तीन महिन्यांपूर्वी सरपंच योगिता लासूनकर यांनी राजीनामा देत सरपंचपदी आश्विनी कुरपाडे विराजमान झाल्या. यानंतर उपसरपंच पदाची निवडणूक रखडली होती.
बिनविरोध निवडीनंतर जल्लोष
गत महिन्यात उपसरपंच गणेश राजपूत याने राजीनामा दिल्यावर गुरुवार, 23 रोजी पार पडलेल्या बैठकीत उपसरपंचपदी विजय गायकवाड यांची बिनविरोध निवड झाली. वॉर्ड क्रमांक 3 मध्ये सरपंच व उपसरपंच हे पद एकाच वेळी मिळाले आहे. भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपतींच्या माहेरात पाच वर्षात पहिल्यांदाच शिवसेनेच्या दोन महिला सरपंचांना पद भूषविण्याची संधी मिळाली आहे.


यावेळी नवनियुक्त उपसरपंच विजय गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी सरपंच योगीता लासूनकर, सरपंच नरेंद्र कुरपाडे, गणेश राजपूत, अमोल व्यवहारे, आकाश राजपूत, धनराज गायकवाड, पवन अंबोरे, दीपक बढे आदी उपस्थित होते.





