भुसावळ सेंट्रल बँकेच्या एटीएममधून 20 हजारांची बॅटरी लांबवली
20,000 battery removed from Bhusawal Central Bank ATM भुसावळ : शहरातील निसर्ग प्लॉझा कॉम्प्लेक्समधील सेंट्रल बँकेच्या एटीएममधून चोरट्यांनी 20 हजार रुपये किंमतीची बॅटरी लांबवली. ही चोरी 10 ते 13 नोव्हेंबरदरम्यान घडली. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल
सेंट्रल बँकेचे शाखा प्रबंधक प्रशांत भारतराव बेहरे (सिद्धीविनायक अपार्टमेंट, भुसावळ) यांनी बाजारपेठ पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, 10 ते 13 नोव्हेंबरदरम्यान अज्ञात चोरट्यांनी निसर्ग प्लॉझा कॉम्प्लेक्समधील सेंट्रल बँकेच्या एटीएममधून चोरट्यांनी 20 हजार रुपये किंमतीची बॅटरी लांबवली. तपास हवालदार सुनील जोशी करीत आहेत.


