तीन वर्षात झालेल्या विविध विभागांच्या कामाची चौकशी हवी : यावलला उबाठा गटाचे निवेदन
यावल नगरपालिकेत शिवसेना उबाठा गटाचे निवेदन


यावल : यावल नगरपालिकेत शुक्रवारी शिवसेना उबाठा गटाकडून निवेदन देण्यात आले. सन 2020 ते सन 2023 दरम्यान नगरपालिकेच्या माध्यमातून विविध विभागाकडून करण्यात आलेल्या विविध कामांची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. काही कामे ही गुणवत्तापूर्वक झालेली नाही, असा संशय निवेदनात नमूद करण्यात आला.
जिल्हाधिकार्यांची दिशाभूल करीत लाटली रक्कम
नगरपालिकेत शुक्रवारी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे गट) शहर शिवसेनेच्या वतीने शुक्रवारी सकाळी निवेदन देण्यात आले. यात त्यांनी म्हटले आहे की, 2020-2021, 2021-2022 व 2022-2023 या तीन आर्थिक वर्षात नगरपालिका अंतर्गत झालेले काम निकृष्ट पद्धत्तीने झाले असून कामे गुणवत्तापूर्वक झालेली नाहीत. खातेनिहाय या कामांची चौकशी करण्यात याव, नमूद वर्षात बांधकाम, आरोग्य, पाणीपुरवठा, व इतर विभागात झालेल्या कामांत अनियमितता झाली असल्याचा संशय आहे. काही खात्यात न झालेल्या कामांची बिले अदा करण्यात आल्याचा व काही कामांत गुणवत्ता पूर्वक कामे न झाल्याचा संशय आहे. आरोग्य विभागात, घनकचरा वगैरे कामात वाढीव रक्कम वाढवून व जिल्हाधिकारी यांची दिशाभूल करून घेण्यात आली आहे. बांधकाम विभागात झालेले काम वर्क ऑर्डरनुसार न होता नित्कृष्ट दर्जाचे काम झाले असल्याचा देखील संशय आहे. सर्व खात्यांची निःपक्षपाती पणे स्वतंत्र समिती नेमून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. निवेदन नगरपालिकेचे मराठे यांनी स्वीकारले. निवेदन देतेप्रसंगी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहर प्रमुख जगदीश कवडीवाले, उपप्रमुख योगेश चौधरी, संतोष धोबी, योगेश राजपूत, निलेश पाराशर, तालुका उप संघटक पप्पू जोशी, आदिवासी शिवसेना तालुका प्रमुख हुसेन तडवी, शहर संघटक सुनील बारी, युवासेना शहर प्रमुख सागर देवांग, युवा सेना सरचिटणीस विजय पंडित कुंभार, युवासेना उप प्रमुख पिंटू कुंभार यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.





