साकेगावात विनापरवाना वाळू वाहतूक करणार्या डंपरवर कारवाई
Action against dumpers transporting sand without license in Sakegaon भुसावळ : अवैधरीत्या वाळू वाहतूक करणार्या डंपरवर महसूल प्रशासनाने कारवाई करीत डंपर केल्याने वाळू वाहतूकदारांमध्ये खळबळ उडाली आहे. साकेगाव, ता.भुसावळ येथे बस स्टॅण्डजवळील पुलाजवळ जळगावकडून येणारा डंपर (एम.एच.19-2313) पथकाने जप्त केले.
कारवाईने उडाली खळबळ
भुसावळ तहसीलदार निता लबडे यांच्या मार्गदर्शनाखाली साकेगाव येथे शुक्रवारी रात्री वाळू वाहतूकीवर कारवाई करण्यात आली. तपासणीत गौण खनिज यांची वाहतूक करणार्या डंपरच्या चालकाकडे पथकातील कर्मचारी यांनी गौण खनिज वाहतुकीबाबत परवाना पावती मागितली असता कोणताही वैध परवाना अथवा पावती नव्हती. वाहन चालक यांच्या जबाबनुसार सदर वाहन विठ्ठल भागवत पाटील यांचे मालकीचे असून वाहन तपासणीवेळी वाहन मालकी संबंधी कागदपत्रे उपलब्ध नव्हते. क्रमांकाबाबतही संशय आहे त्यामुळे सदर वाहन ताब्यात घेण्यात आले. वाहनावर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 48, कलम 7 व 8 नुसार दंडात्मक कार्यवाही करण्यात येत असून वाहन तहसील कार्यालयाच्या आवारात जमा करण्यात आले.


या कारवाईत पिंपळगाव येथील मंडल अधिकारी एफ.एस.खान, भुसावळचे मंडल अधिकारी प्रफुल्ल कांबळे, साकेगावचे तलाठी मिलिंद तायडे, वरणगावचे तलाठी मंगेश पारीसे, कुर्हे येथील तलाठी विशाखा मून, गोजोरा तलाठी साधना खुळे, वराडसीम तलाठी नितीन केले, कोतवाल जितेश चौधरी, शरद पवार, जयराज भालेराव आदींनी कारवाई केली.
