सावखेडासीम अंगणवाडीतून टीव्हीसह मुद्देमाल लांबवला


Sawkhedaseem removed material including TV from Anganwadi यावल : यावल तालुक्यातील सावखेडासीम येथील अंगणवाडीच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्याने डिजिटल स्मार्ट टीव्हीसह दहा हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल लांबवला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर यावल पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा
सावखेडासीम, ता.यावल येथे ग्रामपंचायत कार्यालयाच्या जवळ अंगणवाडी आहे. या अंगणवाडीत स्मार्ट एलईडी टीव्ही, टेबल फॅन, स्टीलची पाण्याची टाकी, सोलर होम लाईट इन्व्हर्टर सह विविध प्रकारचे साहित्य होते मात्र चोरट्यांनी संधी साधून अंगणवाडीच्या दरवाजाचे कुलूप तोडून हे संपूर्ण साहित्य लांबवले. हा प्रकार सकाळी निदर्शनास आल्यानंतर यावल पोलिसात अंगणवाडी सेविका वैशाली महाजन यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार राजेंद्र पवार करीत आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !