ऐनपूर येथे वीज चोरी करताना दोघांना पकडले : पोलिसात गुन्हा दाखल
Two arrested while stealing electricity in Ainpur : A case has been registered with the police यावल : ऐनपूर या गावात राज्य विद्युत वितरण कंपनीच्या वतीने वीज चोरी विरुद्ध धडक मोहिम राबवण्यात आली. यात दोन जण वीज चोरी करतांना आढळून आले व त्यांना चोरी केलेल्या वीज युनिटनुसार दंडाची रक्कम आकारून नोटीस देण्यात आली मात्र या दोघांनी दंड न भरल्याने या दोघांच्या विरोधात यावल पोलिसात वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
दंड न भरल्याने गुन्हा दाखल
ऐनपूर, ता.रावेर येथील राज्य विद्युत वितरण केंद्राचे सहाय्यक अभियंता देवेंद्र जीवराम महाजन यांच्यासह पथकाने गावात वीज चोरीविरुद्ध धडक मोहिम राबवली. यामध्ये सीताराम माणिक गिल्ले व अमर संपत कपिल हे दोघे वीज चोरी करतांना आढळले. संबंधिताना चोरी केलेल्या वीज युनिटनुसार दंडाची रक्कम आकारून नोटीस देण्यात आली मात्र दोघांनी वेळेत दंडाची रक्कम न भरल्याने दोघांविरोधात यावल पोलिसात सहा.अभियंता देवेंद्र महाजन यांच्या फिर्यादीवरून वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार विजय पाचपोळ करीत आहे.


