भुसावळातील घाऊक फळ विक्रेत्यांना बाजार समितीमध्ये स्थलांतरणासााठी प्रशासक अ‍ॅक्शन मोडवर


Admin on action mode for migration of wholesale fruit sellers in Bhusawal to market committee भुसावळ : शहरातील फळ व भाजीपाल्याच्या घाऊक विक्रेत्यांना बाजार समितीमध्ये जागा उपलब्ध करून दिल्यानंतरही 26 घाऊक विक्रेते शहरातील अंतर्गत भागात व्यवसाय करीत आहेत. या घाऊक विक्रेत्यांना आता कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये स्थलांतरीत करण्यासाठी प्रशासन गतीमान झाले आहे. या मोेकळ्या झालेल्या जागेवर प्रशासनाने हॉकर्स झोन उभारणी करण्याचे नियोजन केले आहे.

हॉकर्स झोनसाठी होणार जागेचा वापर
शहरातील फळ व भाजीपाल्याच्या 54 घाऊक विक्रेत्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जागा देण्यात आली आहे. यानंतरही विक्रेते शहरातील डेली बाजारात पूर्वेकडील भागातील दुकाने कायम ठेवून आहेत. यामुळे अवजड माल वाहतुकीच्या ट्रक व वाहने मुख्य बाजारात प्रवेश करतात. यामुळे वाहतूकीची कोंडी होते. यामुळे आता प्रशासनाने घाऊक विक्रेत्यांना बाजार समितीमध्ये स्थलांतरीत करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. यातील काही व्यावसायीकांनी निर्णयास विरोध दर्शवला असला तरी प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर असल्याने घाऊक फळ विक्रेत्यांना बाजार समितीच्या आवारात स्थलांतरीत व्हावेच लागणार आहे. या जागेचा वापर हॉकर्स झोनसाठी देखील आगामी काळात होऊ शकेल.


रीकाम्या जागेवर हॉकर्सचे स्थलांतर शक्य?
बाजारातील अप्सरा चौक ते डिस्को टॉवर दरम्यान असलेला रस्ता मोकळा होईल. मात्र येथील विक्रेत्यांनी नाल्यावर स्लॅब टाकून तेथे स्थलांतरीत होण्याची तयारी दर्शवली आहे. ही प्रक्रिया पूर्ण होत नाही, तोपर्यंत हॉकर्स हे घाऊक विक्रेते बाजार समितीत गेल्यानंतर रिकाम्या जागेवर स्थलांतरीत होण्याची शक्यता अधिक आहे.

दुकानाबाहेरील अतिक्रमणही हटविणार
शहरात पालिकेच्या गाळे तसेच इतर दुकानांमध्येही दुकानांच्या बाहेर सामान ठेवून अतिक्रमण केले जाते. खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या दुकानांच्या बाहेर हातगाडी ठेवून अतिक्रमण होते. शहरात आगामी काळात हे प्रकारही बंद करण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न केले आहेत. पालिकेच्या गाळात अशाप्रमाणे बाहेर सामान ठेवल्यास त्यांच्यावर कराची रक्कम वाढविण्याचे हालचाली पालिकेने सुरू केल्या आहेत.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !