वरणगावातील समाजसेवक संतोष माळी यांना भारत भूषण राष्ट्रीय पुरस्कार


भुसावळ : सामाजिक सदैव अग्रेसर असणारे क्रांतीसूर्य महात्मा फुले बहुउद्देशीय विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा शिवसेना शहरप्रमुख संतोष बळीराम माळी यांना भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून निस्वार्थ सामाजिक कार्य करणारे समाजसेवक म्हणून भारत भूषण राष्ट्रीय पुरस्कार 2023 देण्यात आला. हा पुरस्कार सोहळा शनिवार, 25 रोजी आमदार संजय सावकारे, राजू सूर्यवंशी, उद्योजक मनोज बियाणी, ‘तोंडाय आक्का’, पैसेवाली ताई’ फेम अहिराणी मराठी अभिनेत्री विद्या भाटिया, मराठी अभिनेता विकास महाजन (मुंबई) यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला. अनुश्री सामाजिक संघटनेच्या अध्यक्षा जयश्री इंगळे यांनी राज्यभरातून विविध क्षेत्रात निस्वार्थ सामाजिक काम करणारे 71 समाजसेवक यांना हा पुरस्कार देण्यात आला.

पुरस्कारानंतर अभिनंदनाचा वर्षाव
संतोष माळी यांना ‘भारत भूषण राष्ट्रीय पुरस्कार 2023’ मिळाल्याने माळी समाजाचे अध्यक्ष संजय माळी, सेक्रेटरी नाना माळी, पंच श्रीकांत माळी, गणेश तुकडू माळी, प्रल्हाद माळी, बापू माळी, पांडू माळी, प्रवीण माळी, चेतन माळी, भूषण माळी, अनिल भंगाळे, शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन, नगरपरिषद स्थलांतर विरोधी कृती समितीचे अध्यक्ष आशिष चौधरी, उपाध्यक्ष अशफाख काझी, भास्कर गवळी, शशिकांत चौधरी, संदीप वाघ, अतुल झांबरे, सुनील भोई, संजू कोळी, अजय पाटील, यांच्यासह शिवबा मित्र मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि ‘आपला माणूस’ मित्र परिवारातर्फे संतोष माळी यांचे पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !