399 तासांच्या बचाव मोहिमेनंतर 41 कामगार बोगद्यातून सुरक्षितरीत्या बाहेर


41 workers safely out of tunnel after 399 hours of rescue mission उत्तरकाशी : उत्तराखंडातील बोगद्यात तब्बल 17 दिवसांपासून अर्थात 399 तासांपासून अडकून पडलेल्या 41 कामगारांना सुरक्षीतपणे बाहेर काढण्यात यश आले आहे. उत्तराखंडमधील सिल्क्यारा बोगद्यामध्ये दिवाळीच्या दिवशी झालेल्या अपघातामुळे 41 कामगार अडकले होते. या कामगारांची अखेर 17 दिवसांनी सुटका झाली असून या कामगारांना आता उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे.

दिवाळीच्या दिवशी दुर्घटना
दिवाळीच्या दिवशी पहाटे दुर्घटना झाल्यामुळे कामगार अडकून पडल्याने देशभरात खळबळ उडाली होती. कामगारांना बाहेर काढण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू होते. विदेश तज्ज्ञांची मदतदेखील घेण्यात आली. कामगारांना वाचवण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु होते, पण या कामात विविध अडथळे येत होते. मजूरांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्व बाजुंनी खोदकाम सुरु होते. ऑगर मशिन आपल्या कामात अपयशी ठरली होती. त्यानंतर रॅट मायनर्सला पाचारण करण्यात आले. त्यांच्याच मदतीने कामगारांपर्यंत पोहचणे शक्य झाले.





कामगारांवर रुग्णालयात उपचार : पगारी सुटी मिळणार
काल दुपारपासूनच एनडीआरएफच्या पथकाने रेस्न्यू ऑपरेशन सुरू झाले. यात पहिल्यांदा अनेक अडचणी आल्या. तथापि, 800 मिलीमिटर व्यासाचे भोक पाडण्यात आले. यातून सर्व कामगारांना सुरक्षीतपणे काढण्यात आले. रात्री नऊ वाजेपर्यंत सर्व कामगारांना बाहेर काढण्यात आले. या सर्वांना पहिल्यांदा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

उत्तराखंड सरकारचे नोडल अधिकारी नीरज खैरवाल यांनी म्हटले आहे की रॅट मायनर्स तांत्रिकदृष्ट्या तज्ञ आहेत. यामध्ये 3 जण एकत्र काम करतात. एक व्यक्ती हाताने ड्रिलिंग करते, दुसरा मलबा बाहेर काढतो आणि तिसरा ट्रॉलीमध्ये मलबा टाकते आणि बाहेर पाठवते.

बोगद्यातून बाहेर पडणारा मलबा एका विशिष्ट प्रकारच्या ट्रॉलीच्या साह्याने बाहेर काढण्यात आला. ही ट्रॉली रॅट मायनर भूपेंद्र राजपूत यांनी तयार केली आहे. ही ट्रॉली एकावेळी 2.5 क्विंटल डेब्रिज बाहेर काढते.

 

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !