सावतर शिवारातून 30 हजारांच्या कोंबड्यांसह कापूस लांबवला


Cotton was stretched with 30 thousand chickens from Savatar Shiwar भुसावळ : भुसावळ तालुक्यातील सावतर शिवारातील शेताच्या गोदामातून चोरट्यांनी 30 हजारांच्या कापसासह 20 कोंबड्या लांबवल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी वरणगाव पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा
वरणगाव येथील उदय नारायणराव देशमुख यांनी वरणगाव पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, मंगळवार, 28 रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास त्यांच्या सावतर शिवारातील शेताच्या गोदामातून चोरट्यांनी अंदाजे सहा क्विंटल कापूस भरलेल्या गोण्या व 20 कोंबड्या असा एकूण 30 हजारांचा मुद्देमाल लांबवला. शेतकरी देशमुख हे शेतात म्हशीचे दुध काढण्यासाठी गेल्यानंतर हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसात धाव घेतली. तपास सहाय्यक निरीक्षक आशिषकुमार अडसुळ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार मनोहर पाटील करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !