बनावट दस्तावेजाद्वारे जळगावताील महिलेला 60 लाखांचा गंडा


60 lakhs extorted from Jalgaon woman through fake documents जळगाव : पतीच्या निधनानंतर पंजाब राज्यातून जळगावात आलेल्या महिलेला कुटूंबातील नातेवाईकांनीच 60 लाखांचा गंडा घातला. याप्रकरणी चौघांविरोधात जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

असे आहे फसवणूक प्रकरण
पंजाब राज्यातील राजपुरा येथील शर्वरी दीपक डाहरा (38, शाहु नगर, रींग रोड, जळगाव) या जळगावात हेल्थ कन्सल्टंटचे काम करतात. त्यांचे मोठे दीर अशोक रामचंद्र डाहरा, सुशील रामचंद्र डाहरा व त्यांचे व्यावसायिक मित्र राहुल सुदेश गुप्ता व त्यांचे वडील सुदेशकुमार लालचंद गुप्ता (दोन्ही रा.चंदीगढ) यांनी चंदीगढमधील सेक्टर 15, घर क्रमांक 113 हे नावावरून करून देण्याच्या मोबदल्यात महिलेकडून 60 लाख रुपये घेतले तसेच त्यांची स्टॅम्प पेपरवर सही घेवून त्यांच्या पश्चात त्यांच्या घरातून महत्वाची कागदपत्र व कोरे धनादेश घेवून जात बनावट दस्तावेज तयार करीत त्यांची फसवणूक केली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात वरील चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





घर नावावर करण्याच्या बहाण्याने फसवणूक
शहरातील रिंगरोड परीसरातील माहेर असलेल्या शर्वरी दीपक डाहरा या वास्तव्यास आहे. त्यांचा विवाह 25 जून 2007 मध्ये पंजाब राज्यातील राजपूरा येथील दीपक डाहरा यांच्यासोबत झाला होता. त्यानंतर 23 डिसेंबर रोजी दीपक डाहरा यांचे अपघाती निधन झाल्यामुळे शर्वरी डाहरा या मुलीसोबत चंदीगढ येथे राहत होत्या. डाहरा यांच्याकडे उत्पन्नाचे साधन नसल्याने त्यांनी पतीच्या सहाव्या हिस्साची मागणी केली. त्यावर चर्चा झाल्यानंतर त्यांचे मोठे दीर यांनी सांगितले की, शर्वरी यांना त्यांच्या मुलीसाठी दोन कोटी रुपयांचे घर खरेदी करूनन व कौटुंबिक मालमत्तेच्या आणि व्यावसायाचा वाटा हिस्सा दिला जाईल. त्यानंतर व्यावसायीक मित्र असलेला राहुल गुप्ता याने चंदीगढ येथील घर दाखविले होते. अशोक डाहरा यांनी गुप्ता याला 40 लाख रुपये देवून शर्वरी डाहरा यांच्या नावावर ते घर करुन देण्याचे सांगितले होते त्यामुळे डाहरा या त्या घरात राहून तेथेच हेल्थ कन्सल्टन्सीच व्यवसाय करीत होत्या.

जळगावात चौघांविरोधात गुन्हा दाखल
राहूल गुप्ता याने शर्वरी डाहरा यांच्या ऑफिसमध्ये जावून त्याने बँकेचे दोन धनादेश, सही केलेले कागद व मौल्यवान कागदपत्र व पासपोर्ट साईज फोटो लबाडीच्या इराद्याने घेवून गेला तसेच बनावट दस्ताऐवज तयार करुन डाहरा यांचा विश्वासघात करीत फसवणूक केली. तसेच त्यांच्या मुलीला जीवे ठार मारण्याची देखील धमकी दिली. याप्रकरणी डाहरा यांनी दिलेल्या तक्रारीवरुन त्यांचे मोठे दीर अशोक रामचंद्र डाहरा, सुशिल रामचंद्र डाहरा व त्यांचे व्यावसायिक मित्र राहुल सुदेश गुप्ता व त्यांचे वडील सुदेशकुमार लालचंद गुप्ता (दोघ रा. चंदीगढ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस उपनिरीक्षक गणेश देशमुख करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !