विधानसभा निवडणूक : मध्यप्रदेश राजस्थानसह छत्तीसगडमध्ये भाजपाची मुसंडी : तेलंगनात काँग्रेसला बहुमत
Assembly elections in five states: BJP wins in Madhya Pradesh, Rajasthan and Chhattisgarh : Congress gets majority in Telangana नवी दिल्ली : पाच राज्यात झालेल्या निवडणुकीपैकी चार राज्यांचा निकाल रविवारी जाहीर करण्यात आला. त्यात मध्यप्रदेश राजस्थानसह छत्तीसगडमध्ये भाजपाने मुसंडी घेतली असून तेलंगनात काँग्रस उमेदवार आघाडीवर आहेत. भाजपाने मारलेल्या जोरदार मुसंडीनंतर भाजपा पदाधिकार्यांनी देशभरात जल्लोष सुरू केला असून विजयाचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले आहे.
मध्यप्रदेश भाजपाचेच
मध्य प्रदेश विधाससभेच्या 230 जागांसाठी 17 नोव्हेंबर रोजी मतदान झाले होते. मध्य प्रदेशात यंदा विक्रमी 76.22 टक्के मतदान झाले. हे विक्रमी मतदान भाजपच्या पथ्यावर पडलेले दिसत आहे. मध्य प्रदेश विधानसभेच्या 230 जागांसाठी रविवारी सकाळी 8 वाजेपासून मतमोजणी सुरू आहे. सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये भाजप बहुमताच्या पलीकडे आहे. भाजप 159 जागांवर, तर काँग्रेस 70 जागांवर आघाडीवर आहे. अपक्ष 3 जागांवर पुढे आहेत. ज्या जागांसाठी कल आले आहेत, त्यापैकी 41 जागांवर आघाडीचे अंतर 1 हजारांपेक्षा कमी आहे. बहुमतासाठी 116 जागांची आवश्यकता आहे.




एक्झीट पोल फेल : छत्तीसगडमध्ये भाजपाचा डंका
सर्व एक्झिट पोल आणि अंदाज मागे टाकत भाजपाने छत्तीसगडमध्ये बहुमताकडे वाटचाल केली आहे. सध्या भाजप 52 तर काँग्रेस 36 जागांवर आघाडीवर आहे. रायपूरच्या सर्व आणि बस्तरच्या 8 जागांवर भाजपची आघाडी आहे. उपमुख्यमंत्री टीएस सिंहदेव, विधानसभा अध्यक्ष चरणदास महंता आणि 7 मंत्री मागे आहेत. मात्र, मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी पुन्हा पुढाकार घेतला आहे.
तेलंगणा काँग्रेसकडे !
तेलंगणा विधानसभेच्या 119 जागांची मतमोजणी सुरू झाली आहे. काँग्रेस 67 जागांवर आघाडीवर आहे, भारत राष्ट्र समिती 39 जागांवर, भाजप 11 आणि -खचखच् 3 जागांवर आघाडीवर आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष रेवंत रेड्डी यांच्यामध्ये चुरशीची लढत आहे. रेड्डी 2 हजारांहून अधिक मतांनी आघाडीवर आहेत.
तथापि, के चंद्रशेखर राव यांच्या पारंपरिक जागेवरून गजवेल आघाडीवर आहेत. हैदराबादच्या जुबली हिल्समधून काँग्रेसचे उमेदवार आणि माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन आघाडीवर आहेत. गोसमहलमधून भाजपचा हिंदू चेहरा टी राजा सिंह पिछाडीवर आहेत. एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांचे भाऊ अकबरुद्दीन ओवेसी हे चंद्रयांगुट्टा मतदारसंघातून आघाडीवर आहेत.
राजस्थानमध्ये भाजप आघाडीवर
राजस्थानमध्ये विधासभेच्या 200 जागा आहेत. त्यापैकी 199 जागांवर मतदान झाले आहे. या ठिकाणी यंदाही पाच वर्षांनी सरकार बदलण्याची परंपरा दिसत आहे आहे. 199 पैकी 115 जागांवर भाजपने आघाडी घेत काँग्रेसला धक्का दिला आहे. काँग्रेस 71 जागांवर आघाडीवर आहे.