भुसावळातील हिंदी महाविद्यालयातर्फे मृत विद्यार्थ्याच्या वारसाला धनादेश प्रदान


भुसावळ : शहरातील श्री संत गाडगेबाबा हिंदी महाविद्यालयातील प्रथम वर्ष बी.कॉम.मध्ये शिक्षण घेत असलेला विद्यार्थी योगेश संजय दुसाने याचा नाशिक येथे 27 जुलै 2022 रोजी दुचाकी अपघातात मृत्यू झाला होता.

वारसांना धनादेश प्रदान
महाविद्यालयातर्फे प्रत्येक विद्यार्थ्यांचा अपघाती विमा न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून काढण्यात आला असल्याने विद्यार्थ्यांच्या अपघाती मृत्यूनंतर महाविद्यालयाद्वारे न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीकडे अपघाती विम्याचा दावा दाखल करण्यात आला. विद्यार्थ्याचे मृत्युपत्र, पंचनामा व अन्य कागदपत्राच्या आधारावर कंपनीद्वारे तीन लाखांचा विमा मंजूर केल्यानंतर मंजूर विम्याचा धनादेश हिंदी सेवा मंडळाचे सचिव मधुलता शर्मा व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रमेश जोशी यांच्याहस्ते मयत मुलाचे वडील संजय प्रभाकर दुसाणे यांना सुपूर्द करण्यात आला. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या या कल्याणकारी योजनेमुळे अल्पशी मदत करणे शक्य झाल्याचे प्राचार्य डॉ.रमेश जोशी म्हणाले. या छोटेखानी कार्यक्रमास सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !