महाराष्ट्र पोलिस दलात कामाच्या संधीमुळे जीवन सार्थक

सेवानिवृत्तप्रसंगी रावेरचे पोलिस निरीक्षक कैलास नागरे यांचे प्रतिपादन


Career opportunity in Maharashtra Police Force makes life worthwhile रावेर : जगात गौरवण्यात आलेल्या महाराष्ट्र पोलिस दलात काम करण्याची संधी मिळाल्याने जीवन सार्थक झाले. रावेर शहरात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी मला शहरातील नागरीकांनी सहकार्य केल्याने शहरात चांगले काम करता आले, असे प्रतिपादन रावेरचे पोलिस निरीक्षक कैलास नागरे यांनी सेवावृत्तीप्रसंगी आयोजित सत्कारप्रसंगी केले. निरीक्षक कैलास नागरे सेवानिवृत्त झाल्याने एका कार्यक्रमात त्यांना निरोप देण्यात आला.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
यावेळी व्यासपीठावर प्रांताधिकारी कैलास कडलग, उपविभागीय अधिकारी राजकुमार शिंदे, तहसीलदार बंडू कापसे, मुख्याधिकारी स्वालिहा मालगावे, वनक्षेत्रपाल अजय बावणे, सहाय्यक पोलिस निरीक्षक शीतलकुमार नाईक, सिद्धेश्वर आखेगावकर, आशिषकुमार अडसूळ, डॉ.रणजीत पाटील, तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब वाळके उपस्थित होते. याप्रसंगी प्रांताधिकारी कैलास कडलग, वैशाली नागरे, प्रल्हाद महाजन, दिलीप कांबळे, अब्दुल मुत्तलिब, डॉ.रणजीत पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक दिलीप वैद्य यांनी केले.


कैलास नागरेंचा आदर्श घ्या
पोलिस निरीक्षक कैलास नागरे यांनी कुशल हाताळणी करून रावेरसारख्या संवेदनशील शहरात कायदा सुव्यवस्था अबाधीत राखण्यासाठी परीश्रम घेतले. कैलास नागरे यांनी पोलिस दलात अत्यंत चांगली सेवा दिली. त्यांचा आदर्श पोलिस दलातील अधिकारी कर्मचारी यांनी घ्यावा, असे आवाहन प्रांताधिकारी कैलास कडलग यांनी केले.

यांची कार्यक्रमासउपस्थिती
या कार्यक्रमास रावेर कृउबा सभापती सचिन पाटील, युवा नेते धनंजय चौधरी, माजी नगराध्यक्ष हरीष गणवाणी, रमेश महाजन, डॉ.भगवान कुयटे, डॉ.दत्तप्रसाद दलाल, पीपल्स को-ऑपरेटीव्ह बँकचे संचालक सोपान साहेबराव पाटील, हेमंत नाईक, घनश्याम पाटील, ज्ञानेश्वर महाजन, अशोक शिंदे, अनिल चौधरी, अ‍ॅड.प्रवीण पाचपोहे, संतोष पाटील, भास्कर महाजन, सी.एस.पाटील, हेमंत नाईक, नामदेव महाजन, विनायक महाजन, बाळू शिरतुरे यांच्यासह शहरातील प्रतिष्ठित नागरीक, शांतता समिती सदस्य, पोलिस पाटील मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !