तीन राज्यात भाजपाचे कमळ फुलताच भुसावळात कार्यकर्त्यांचा जल्लोष
As soon as the lotus flower of BJP bloomed in three states, the workers cheered in Bhusawal भुसावळ : मध्यप्रदेश, राजस्थान व छत्तीसगढमधील विधानसभा निवडणुकीत भाजपाचे कमळ फुलल्यानंतर देशभरात जल्लोष केला जात असताना भुसावळातही पदाधिकार्यांनी जल्लोष केला. चार राज्यातील विधानसभा निवडणुकीचा रविवारी निकाल घोषित करण्यात आला. तीन राज्यात भाजपाचे कमळ फुलले तर तेलंगना राज्यातही भाजपाची टक्केवारी वाढल्याचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर स्थानिक भाजपा आमदार संजय सावकारे यांच्या नेतृत्वात त्यांच्या संपर्क कार्यालयाबाहेर भाजपा कार्यकर्त्यांनी रविवारी दुपारी फटाक्यांची आतषबाजी केली पेढे वाटप करून जल्लोष केला. ‘भाजप जिंदाबाद’, ‘जय श्रीराम’ व पंतप्रधान मोदींजीच्या समर्थनार्थ घोषणा यावेळी देण्यात आल्या.
तीन राज्यातील विजयाचा जल्लोष
चार राज्यातील विधानसभा निवडणुकींचा रविवारी निकाल जाहीर झाला. त्यात मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड या राज्यात भारतीय जनता पार्टीने बहुमत मिळवले तर तेलंगणा राज्यातही भारतीय जनता पार्टीचा मतदानाचा टक्का वाढून तेथील भाजपाच्या जागा वाढल्यानंतर भुसावळातील आमदार संजय सावकारे यांच्या नेतृत्वात पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांच्या कार्यालयाबाहेर जोरदार जल्लोष केला. यावेळी कार्यकर्त्यांनी फटाके फोडात विजय उत्सव साजरा केला. आमदार संजय सावकारे यांनी कार्यकर्त्यांना पेढे खाऊ घालत हा विजय कार्यकर्त्यांचा व भारतीय जनता पार्टीने केलेल्या विकासामुळे शक्य झाल्याचे नमूद केले. या निवडणुकीमध्ये माजी पालकमंत्री तथा भुसावळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय सावकारे यांना मध्यप्रदेशातील काही विधानसभा मतदारसंघाची विशेष जबाबदारी देण्यात आली होती.


यांची होती उपस्थिती
भाजपाने केलेल्या जल्लोषप्रसंगी भारतीय जनता पार्टी जिल्हा सरचिटणीस तथा शहराध्यक्ष परीक्षीत बर्हाटे, प्रमोद सावकारे, जिल्हा उपाध्यक्ष सतीश सपकाळे, ग्रामीण अध्यक्ष भालचंद्र पाटील, माजी प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी, मनोज बियाणी, विधानसभा निवडणूक प्रमुख संजय पाटील, बुथ विस्तारक रमाशंकर दुबे, शहर सरचिटणीस संदीप सुरवाडे, दिलीप कोळी, प्रवीण इखणकर, सुनील महाजन, किरण चोपडे, सदानंद उन्हाळे, जितेंद्र सपकाळे, गोलू पाटील, माजी नगरसेवक, पुरूषोत्तम नारखेडे, राजेंद्र आवटे, प्रा.दिनेश राठी, बापू महाजन, अॅड.बोधराज चौधरी, प्रमोद नेमाडे, पिंटू ठाकुर, देवा वाणी, शेखर इंगळे, पवन बुंदेले, युवा मोर्चा अध्यक्ष अनिरूद्ध कुलकर्णी, राजु खरारे, प्रमोद पाटील, अर्जुन खरारे, राहुल तायडे, रवी ढगे, प्रशांत पाटील, विशाल जंगले, पराग भोळे, सुमित बर्हाटे, विलास अवचार, संजय बोचरे, कैलास पाटील, नरेंद्र पाटील, दीपक भोळे, देविदास सावळे, चेतन सावकारे, सचिन येवले, गोपी राजपूत, अतुल गोसावी, सागर जाधव आदींची उपस्थिती होती.





