मिझोरमच्या निवडणुकीत झोराम पीपल्स मूव्हमेंटचे वर्चस्व
Zoram People’s Movement dominates Mizoram elections नवी दिल्ली : नुकत्याच पाच राज्यांच्या झालेल्या निवडणुकीपैकी चार राज्यांचा निकाल रविवारी जाहीर झाल्यानंतर त्यात तीन राज्यात भाजपाने तर एका राज्यात काँग्रेसने वर्चस्व मिळवले होते. उर्वरीत मिझोराम राज्याची मतमोजणी रविवारी असलीतरी एक दिवस ही मतमोजणी पुढे ढकलण्याची मागणी सर्व पक्षांतर्फे झाल्यानंतर रविवार ऐवजी सोमवारी येथे मतमोजणी घेण्यात येत असून आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार झिोराम पीपल्स मूव्हमेंटचे येथे वर्चस्व दिसून येत आहेत. झेडपीएमचे प्रमुख लालदुहोमा यांच्या पक्षाने 20 जागांवर विजय मिळवला असून सात जागांवर त्यांचे उमेदवार आघाडीवर असल्याने बहुमताचा आकडा त्यांनी गाठल्याचे स्पष्ट आहे.
काँग्रेससह भाजपाला मतदारांनी नाकारले
मिझोरममध्ये काँग्रेसला अपेक्षित यश मिळालेले नाही. गतवर्षीच्या तुलनेत यंदा काँग्रेसच्या जागा घटल्या आहेत. केवळ एका जागेवर काँग्रेस उमेदवार आघाडीवर असून भाजपचे दोन उमेदवार निवडून आले आहेत. सत्ताधारी मिझो नॅशनल फ्रंटला सत्तेतून पायउतार व्हावे लागले. एमएनएफने केवळ सात जागा जिंकल्या असून तीन जागांवर त्यांचे उमेदवार आघाडीवर असल्याने लालदुहोमा यांच्या झोराम पीपल्स मूव्हमेंटचे सरकार स्थापन होणार हे निश्चित आहे.




#WATCH सेरछिप: ZPM के मुख्यमंत्री पद के उम्मीदवार लालदुहोमा ने कहा, "मिज़ोरम वित्तीय संकट का सामना कर रहा है…निवर्तमान सरकार से हमें यही विरासत मिलने वाली है…हम अपनी प्रतिबद्धता पूरी करने जा रहे हैं। वित्तीय सुधार आवश्यक है और उसके लिए हम एक संसाधन जुटाने वाली टीम बनाने जा… pic.twitter.com/Mx1cemn62m
— ANI_HindiNews (@AHindinews) December 4, 2023
एक्झीट पोटलचा अंदाज ठरला खरा
74 वर्षीय माजी आयपीएस अधिकारी लालदुहोमा आणि त्यांचा पक्ष झोरम पीपल्स मूव्हमेंट येथे विजयी होईल, असा अंदाज एक्झिट पोलने वर्तवला होता व तो अंदाज येथे मात्र खरा ठरला आहे. अनेक दिग्गज निवडणुकीत पराभूत झाले आहेत. मिझोरमचे भावी मुख्यमंत्री म्हणून सध्या एका नावाची चर्चा आहे. ते नाव म्हणजे लालदुहोमा.
आमच्या सरकारपुढे अनेक आव्हाने
लालदुहोमा म्हणाले की, आगामी सरकारपुढे अनेक आव्हाने आहेत. गत सरकारने केलेल्या आर्थिक कर्जातून पुढे येत राज्याच्या विकासासाठी काम करायचं आहे. राज्यपालांची भेट घेऊन मी उद्या किंवा परवा शपथविधी सोहळ्याबाबत विचारणा करणार आहे, असेही लालदुहोमा म्हणाले. त्यांच्या नेतृत्त्वात मिझोरममध्ये सत्तेत आला आहे.
#WATCH | #MizoramElections2023 | Serchhip: ZPM Chief Ministerial candidate Lalduhoma says,"… Tomorrow or the day after tomorrow I will meet the Governor…Swearing-in will be within this month… pic.twitter.com/An2dikjljq
— ANI (@ANI) December 4, 2023