डोंगरकोठारा शेत-शिवारातून विद्युत कंपनीचे तार लांबवले : विजेअभावी शेतकर्‍यांना हंगामात फटका


यावल : यावल तालुक्यातील डोंगरकठोरा शेत-शिवारातून राज्य विद्युत वितरण कंपनीच्या लघूदाब वाहिनीवरील तार अज्ञात चोरट्यांनी चोरी केले. तब्बल 400 मीटर लांबीचे व 15 हजार रुपये किंमतीचे तार चोरीला गेल्याने याप्रकरणी यावल पोलिसात अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

वीज गुलने शेतकर्‍यांचे हंगामात हाल
डोंगरकठोरा, ता.यावल शेत-शिवारात राज्य विद्युत वितरण कंपनीचे 100 के.व्ही.क्षमतेचे रोहित्र असून या रोहित्रावरून शेतकर्‍यांना शेती-पंपासाठी कनेक्शन देण्याकरीता खांब टाकून त्याच्यावर लघूदाबाचे तार टाकले होते. मध्यरात्रीनंतर या खांबावरील सुमारे 400 मीटर लांबीचे व 15 हजार रुपये किंमतीचे तार अज्ञात चोरट्यांनी चोरी केले. हा प्रकार सकाळी निदर्शनास आला. याप्रकरणी यावल पोलिसात विद्युत वितरण कंपनीचे वरीष्ठ तंत्रज्ञ उमेश बाळू पाटील यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक किशोर परदेशी करीत आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !