हिंगणघाट घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा द्या
शिवसेना युवा-सेनेची मागणी : खटला जलदगती न्यायालयात चालवून न्यायाची मागणी
भुसावळ : हिंगणघाट घटनेतील तरुण प्राध्यापिकेचा उपचाराच्या सातव्या दिवशी सोमवारी सकाळी मृत्यू झाल्यानंतर आरोपीविरुद्ध कारवाईसाठी देशभरात संतापाची उसळली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना युवा-सेनेतर्फे प्रांताधिकारी प्रशासनाला सोमवारी निवेदन देवून खटला जलदगती न्यायालयात चालवण्याची मागणी करण्यासह आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली. अशी कठोर शिक्षा झाल्यानंतर समाजातील कुणीही असा प्रकार करण्याची हिंमत करणार नाही व तरच समाजातील आपल्या माता-भगिनी सुरक्षीत राहतील असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यांची निवेदनावर स्वाक्षरी
निवेदनावर उमाकांत शर्मा (नमा), शिवसेना उपजिल्हा प्रमुख श्याम गोंदेकर, शिव व्यापारी सेना संपर्क प्रमुख अबरार शेख, जिल्हाप्रमुख शिक्षक सेना विनोद गायकवाड, युवा सेना तालुका प्रमुख हेमंत ब्राहते, शिवसेना उपशहर प्रमुख राकेश खरारे, उपशहर संघटक
नबी पटेल, कृष्णा साळी, चेतन भोई, रवींद्र भोई, गौरव शर्मा आदींसह शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.



