भुसावळात पालखी सोहळ्याने संजीवन समाधी सोहळ्याला सुरूवात


भुसावळ : शहरातील गजानन महाराज नगर, प्रभात कॉलनीत ज्ञानेश्वर माऊलींची समाधी पूर्व दर्शन पालखी मिरवणूक काढण्यात आली. भाविकांनी रांगोळ्या काढून पालखीचे स्वागत करून दर्शन घेतले. टाळ मृदुंगाच्या गजरात भक्त तल्लीन झाले होते. 9 ते 11 डिसेंबर 2023 या कालावधीत ज्ञानेश्वर माऊली संजीवन समाधी सोहळा शहरातील कोळी समाज मंगल कार्यालय, गजानन महाराज नगरात होत आहे.

उत्सवाचे 78 वे वर्ष
उत्सवाचे 78 वे वर्ष आहे. श्री ज्ञानेश्वर माऊली सांस्कृतिक व बहुउद्देशीय मंडळ भुसावळ विगत 77 वर्षांपासून ही श्रेष्ठ परंपरा जोपासत आहे. या उत्सवात दररोज सायंकाळी 7 वाजता पुणे येथील स्वामी स्वरूप स्वानंद, डॉ.सुधीर पांडे यांची तीन दिवस आध्यात्मिक प्रवचने होणार आहेत. 11 रोजी सकाळी समाधिकाळाचे अभंग वाचन, कीर्तन व काला होऊन दुपारी 12 वाजता महाप्रसाद वितरण होईल. भाविकांनी या सर्व कार्यक्रमांचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष भास्कर भोळे, सचिव डॉ.रमेश जोशी, उपाध्यक्ष सुरेश चौधरी, दिलीप झोपे व सर्व सदस्यांनी केले आहे.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !