वरणगाव सर्कलला मिळाले अॅटेस्टेडसाठी अधिकारी
Varangaon circle got officers for attested वरणगाव : वरणगाव सर्कलला अॅटेस्टेडचे अधिकार नसल्याने नागरीकांना व विद्यार्थी यांना भुसावळ जावे लागत होते. वरणगाव सर्कलला अॅटेस्टेडचे अधिकार द्यावे, अशी लेखी मागणी वरणगावचे माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आमदार संजय सावकारे यांना निवेदन देऊन केली होती. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व तहसीलदार नीता लबडे यांची 4 डिसेंबर भेट घेऊन निवेदन दिले होते.
पाठपुराव्याला आले यश
तहसीलदार यांनी तातडीने वरणगाव सर्कलला अॅटस्टेडचे अधिकाराचे आदेश काढले. वरणगाव शहरातील व परिसरातील संजय गांधी इंदिरा गांधी लाभार्थी प्रकरणात आर्थिक पिळवणूक होत असून भुसावळ तहसीलकडून वारंवार फिरवा फिरव करून त्रास दिला जात असल्याने त्याबाबत तहसीलदार निता लबडे यांच्याकडे माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी व जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद भैसे यांनी तक्रार केली. वरणगाव येथे एक तहसीलची शाखा उघडण्यात यावी, अशी सुद्धा करण्यात आली. तहसीलदार यांनी वरणगाव येथे लवकरच आपण संजय गांधी इंदिरा गांधीसह लाभार्थींचा कॅम्प घेण्याचे आश्वासन दिले. दरम्यान, वरणगाव सर्कलला कागदपत्र अॅटेस्टेड करण्याचे अधिकार मिळाल्याने वरणगावकरांना आता भुसावळला जाण्याची गरज भासणार नाही. नागरीकांनी वरणगाव येथील सर्कलकडे कागदपत्रे अॅटेस्टेड करावीत, असे आवाहन माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी केले आहे.







