भुसावळ पालिकेच्या जीर्ण इमारतीसह निवासस्थानांवर पडणार हातोडा


The hammer will fall on the residences along with the dilapidated building of the Bhusawal Municipality भुसावळ : भुसावळ पालिकेच्या जीर्ण इमारतीतील दुकानदार उच्च न्यायालयात गेल्यानंतर इमारत पाडण्याच्या कामाला बे्रक लागला असलातरी दुकानांव्यतिरीक्त अन्य इमारतीचा भाग पालिकेतर्फे पाडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासोबतच श्री संत गाडगे महाराज रुग्णालयाच्या परिसरातील जीर्ण कर्मचारी निवासस्थाने देखील पाडण्यात येणार आहेत. सोमवारी मुख्याधिकारी महेश वाघमोडे व अधिकार्‍यांनी या जीर्ण इमारतींची पाहणी केली. उपमुख्याधिकारी लोकेश ढाके, परवेज शेख आदींची उपस्थिती होती.

आजपासून जीर्ण वसाहत पाडणार
मंगळवारपासून जीर्ण वसाहत तोडण्यात येणार आहे तसेच पालिकेच्या जून्या इमारतीमधील दर्शनी भागातील दुकानांचा भाग वगळता मागील जीर्ण झालेले बांधकाम व दुकानांच्या वरील जीर्ण बांधकामही बुधवारपासून पाडण्यात येणार आहे. पालिकेने शहरातील काही जीर्ण इमारतींच्या मालक, भाडेकरुंनाही नोटीस बजावल्या आहेत. पालिकेकडून आगामी काळात या जीर्ण इमारतींवरही बुलडोझर फिरवले जाणार आहे. काही कायदेशिर दावे सुरू असलेल्या इमारतींना यातून तूर्त वगळले जाणार आहे. याबाबतही पालिकेने व्यापक नियोजन केले आहे.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !