भुसावळ पोलिस दलातील खाकीतील शिलेदारांचा सहृदयी सन्मान
चोरी, घरफोडीसह गुन्ह्यांचा निपटारा करणारे पाच कर्मचारी ‘एम्प्लॉयी ऑफ द मंथ‘ पुरस्काराचे मानकरी
Heartfelt tribute to the khaki-clad Shiledars of the Bhusawal Police Force भुसावळ : भुसावळ विभागातील पाच पोलिस कर्मचार्यांनी चोरी, घरफोडीसह गुन्ह्यांचा निपटारा केल्याने त्यांना ‘एम्प्लॉयी ऑफ द मंथ पुरस्काराने गौरवण्यात आले. पोलिस अधिकार्यांच्या उपस्थितीत पाच कर्मचार्यांचा सन्मान करण्यात आला. सन्मानीत करण्यात आलेल्या कर्मचार्यांमध्ये भुसावळ शहर पोलिस ठाण्याच्या महिला हवालदार आशा अब्बास तडवी, भुसावळ बाजारपेठचे हवालदार उमाकांत पन्नालाल पाटील, भुसावळ तालुक्याचे कॉन्स्टेबल राहुल कडू महाजन, नशिराबादचे हवालदार गुणवंत श्रीधर सोनवणे, शहर वाहतूक शाखेचे हवालदार अजय दत्तात्रय पाटील यांचा समावेश आहे.
गुन्हे आढावा बैठकीत कर्मचार्यांचा सन्मान
पाचही कर्मचार्यांनी अर्जांची निर्गती तसेच चोर्यांचा व गुन्ह्यांचा उलगडा तसेच वाहन चोरी व घरफोडी, न्यायालयात केस शाबीत करणे, एम.व्ही.अॅक्टच्या केसेस करणे आदी कौतुकास्पद कामगिरी केल्याने त्यांना ‘एम्प्लॉयी ऑफ द मंथ पुरस्काराने गुन्हे आढावा बैठकीत गौरवण्यात आले. पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, बाजारपेठ पोलिस निरीक्षक बबन आव्हाड, नशिराबादचे सहाय्यक निरीक्षक रामेश्वर मोताळे, शहर वाहतूक शाखेच्या सहाय्यक निरीक्षक रुपाली चव्हाण, सहाय्यक निरीक्षक अनिल मोरे तसेच भुसावळ विभागातील दुय्यम अधिकारी व 50 कर्मचारी उपस्थित होते.








