सरकारचे सर्व निर्णय नागरीकांसाठी लाभदायकच : आमदार संजय सावकारे


All government decisions are beneficial for citizens : MLA Sanjay Savkare भुसावळ : रेशनकार्डधारकांना त्यांच्या हक्काचे धान्य मिळावे, धान्याचा काळाबाजार होऊ नये, यासाठी शासनाकडून पारदर्शकता आणण्यासाठी क्यूआर कोड असलेला रेशनकार्ड देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रेशनकार्ड काढण्यासाठीची होणारी गैरसोय पाहता ऑनलाईन रेशन कार्ड उपलब्ध करून देण्याचा सरकारचा निर्णय हा नागरीकांसाठी लाभदायक आहे, असे प्रतिपादन भुसावळ मतदारसंघाचे आमदार संजय सावकारे यांनी केले. प्राषी ग्राहक सेवा केंद्राचे संचालक प्रतीक आंबेकर व भाजप कार्यकर्ते प्रा.धीरज पाटील यांच्यातर्फे परिसरातील शिधापत्रिकाधारक ग्राहकांसाठी आयोजित डिजिटल रेशनकार्ड शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

यांची कार्यक्रमास उपस्थिती
प्राषी ग्राहक सेवा केंद्राचे भुसावळ मतदार संघाचे आमदार संजय सावकारे यांनी उद्घाटन केले. प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे, भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष सतीश सपकाळे, जिल्हा सरचिटणीस परीक्षीत बर्‍हाटे, शहराध्यक्ष युवराज लोणारी, सरचिटणीस रमाशंकर दुबे, माजी नगरसेवक राजेंद्र नाटकर, महिला आघाडी शहराध्यक्ष अनिता आंबेकर, युवा मोर्चा शहराध्यक्ष अनिरुद्ध कुळकर्णी, भाजप पदवीधर प्रकोष्ठ तालुका संयोजक प्रा. सीमा पाटील यांच्या उपस्थितीत डिजिटल रेशनकार्डचे वाटप करण्यात आले.


सामान्यांचा त्रास होणार कमी : युवराज लोणारी
ऑनलाईन रेशनकार्ड मिळण्याच्या पद्धतीमुळे सामान्यांना होणारा त्रास वाचणार आहे. ऑनलाईन प्रणालीद्वारे नवीन रेशनकार्डसाठी अर्ज करता येत आहे. तसेच पत्ता बदलणे, रेशनकार्डमध्ये नवीन नाव समाविष्ट करणे, वगळणे आदी कामे सहज करता येणे शक्य झाले असल्याचे भाजपा शहराध्यक्ष युवराज लोणारी म्हणाले. शिबिरात ‘ई-रेशनकार्डाची सुविधा उपलब्ध झाल्यानंतर 115 ग्राहकांनी त्याचा लाभ घेतला आहे. त्यात अंत्योदय योजनेतील 31, प्राधान्य योजनेतील 60 आणि राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील 24 कार्डधारकांचा समावेश आहे,’ अशी माहिती आयोजक प्रा.धीरज पाटील यांनी दिली. शिबिराच्या यशस्वीतेसाठी प्रतीक आंबेकर, युवा मोर्चा शहर उपाध्यक्ष अमोल पाटील, पौर्णिमा आंबेकर, वंदना सनांसे, शुभम सोनार, शिल्पा काठोके, पौर्णिमा अट्रावलकर, वैशाली सैतवाल, हमक्षी मते, महेश कोळी, कैलास पाटील, अमोल झटकार, गिरीश राणे, सचिन वारके, स्वप्नील सपकाळे, ललित नेहेते, कुंदन शिरुड, धनराज रोटे, धनेश पाटील यांनी परीश्रम घेतले.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !