स्नेहदीप महिला संस्थेतर्फे निराधार अंध बांधवांना ब्लँकेटचे वाटप
Distribution of blankets to destitute blind brothers by Snehdeep Mahila Sanstha भुसावळ : स्नेहदीप निराधार महिला आश्रमाच्या वर्धापनदिनानिमित्त अंध व अपंग बांधवांना शहरातील लिलाई मंगल कार्यालयात ब्लँकेट वाटप करण्यात आले. अध्यक्षस्थानी चेअरमन आरती चौधरी होत्या. लिलाई मंगल कार्यालयात गुरूवारी सकाळी 11 वाजता अंध व अपंग बांधवाना स्नेहादिप निराधार महिला आश्रमाच्या वर्धापनदिनानिमित्ताने थंडीचे दिवस असल्याने संस्थेने ब्लँकेट (कांबळ) वाटप केले.
संकटात नेहमीच मदतीचा हात : आरती चौधरी
आपल्या अध्यक्षीय भाषणात आरती चौधरी यांनी सांगितले की, अडचणी प्रत्येकाच्या आयुष्यात कमी अधिक प्रमाणात असतात, पण त्यावर मात करून पुढे जायचे असते. भगवान श्रीकृष्णाला माता कुंतीने अडचणींचे वरदान मागितले होते. कारण संकटात, अडचणीत भगवंताचे स्मरण होईल तसेच आपणही संकटात अडचणीत, देवाचे स्मरण ठेवा, आमचे मदतीचे हात कायम तुमच्या बरोबर आहेतच. लायन्स क्लबचे अध्यक्ष राजेश पाटील, कॅबिनेट ऑफीसर गोपाळ अग्रवाल, डॉ.नरेंद्र भोलाणे, स्वाती भोळे, संजय पाटील, खानदेश अंधकल्याण संस्थेचे मानद अध्यक्ष डॉ.बाळू पाटील व पराग भोळे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते कांबळ वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रतन पाटील, सुरेश पाटील, जागृत पाटील यांनी सहकार्य केले. यावेळी नांदुरा, मलकापूर, जळगाव, बुलढाणा, चिनावल, फेकरी व भुसावळचे अंध निराधार बंधू-भगिनी उपस्थित होत्या. यावेळी पोलिस पाटील मधुकर पाटील यांनी अन्नदान केले.







