भुसावळात लोक अदालत : 69 खटले निकाली

76 लाख 54 हजार रुपये तडजोडीत वसूल


Bhusawalat Lok Adalat: 69 cases settled भुसावळ : भुसावळ सत्र न्यायालयात शनिवारी लोक अदालतीचे आयोजन
करण्यात आले. दाखलपूर्व चार हजार 110 तर कोर्टातील एक हजार 878 असे एकूण पाच हजार 988 खटले ठेवण्यात आले. त्यापैकी 69 खटले निकाली निघाले. यातून 76 लाख 54 हजार 831 रुपये तडजोडीत वसूल करण्यात आले.

तीन पॅनल गठीत
अतिरीक्त सत्र न्यायालयात शनिवारी झालेल्या लोक अदालतीसाठी तीन पॅनल होते. पहिल्या पॅनलमध्ये प्रमुख म्हणून जिल्हा न्यायाधीश- 3 आर.एम. जाधव, दुसर्‍या पॅनलवर सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठस्तर एच.ए.पाटील तर तिसर्‍या पॅनलच्या प्रमुख म्हणून सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठस्तर के.एम. पत्रे या होत्या. यावेळी पंच सदस्य म्हणून अ‍ॅड.जया झोरे, नेहा खैरनार, स्मिता पाटील तसेच वकील बार संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. तुषार पाटील, अ‍ॅड.पी.ई.नेमाडे, अ‍ॅड.मगर आदी उपस्थित होते.



लोक अदालतीत दाखलपूर्व चार हजार 110 तर कोर्टातील 1 हजार 878 असे एकूण पाच हजार 988 खटले ठेवले ठेवण्यात आले. त्यापैकी 69 खटले निकाली निघाले. यातून 76 लाख 54 हजार 831 रुपये तडजोडीत वसूल करण्यात आले. दाखल पूर्व 11 तर कोर्टातील 58 असे 69 खटले लोक अदालतीत निकाली निघाले. दाखल पूर्व 11 खटले निकाली निघाले असून त्यातून 29 लाख 1 हजार 929 रूपये तर कोर्टातील निकाली निघालेल्या 58 खटल्यात 47 लाख 52 हजार 902 रुपये मिळून एकूण 76 लाख 54 हजार 831 रुपये वसूल झाले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !