साकेगावातील 55 वर्षीय इसम बेपत्ता
भुसावळ : तालुक्यातील साकेगाव येथील संतोष भिला पाथरवट (55) हा इसम घरात कुणाला काही एक न सांगता 1 फेब्रुवारीपासून बेपत्ता झाला आहे. रंग सावळा, शरीराने सडपातळ, उंची पाच फूट सहा इंच, डोळे साधारण, नाक सरळ, केस काळे-पांढरे, अंगात पांढर्या रंगाचे उभ्या रेघांचा शर्ट व पांढर्या फिकट रंगाची फुल पँट असे वर्णन आहे. संबंधित इसमाबाबत काही माहिती असल्यास भुसावळ तालुका पोलिस ठाण्याचे कॉन्स्टेबल विजय पोहेकर यांच्याशी संपर्क साधावा, असे कळवण्यात आले आहे.
