गोपीनाथ मुंडे हे खर्‍या अर्थाने बारा बलुतेदार वंचिताना न्याय देणारे लोकनेते

भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल जावळे : *वरणगाव येथे गोपीनाथ गड साकारतोय


Gopinath Munde is a true leader of the people who gives justice to the twelve Balutedars वरणगाव : केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांची जयंती वरणगाव शहरातील साकारत असलेल्या गोपीनाथ मुंडे स्मृती स्थळावर साजरी करण्यात आली. भाजपाचे जिल्हाध्यक्ष अमोल हरीभाऊ जावळे यांच्याहस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. वरणगाव शहरातील बारा बलुतेदार, अठरा पगड जातीचे प्रमुख उपस्थित होते. या वास्तूचे गोपीनाथ गड असे नामकरण यावेळी करण्यात आले. कामगारांना साहित्य वाटप करण्यात आले. लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडे यांनी बारा बलुतेदार अठरा पगड जातीला एकत्र केले. माळी धनगर वंजारी समाजाची मोट बांधून अठरा पगड जाती एकत्र आणल्या आणि भाजपाचा राज्यात वटवृक्ष केले. आज ते नसल्याचे दुःख असून मुंडे साहेब यांचे विचार तळागाळात पोहचावा, असे आवाहन त्यांनी केले.

यांची होती उपस्थिती
माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी प्रास्ताविक तर सूत्रसंचालन अ‍ॅड.ए.जी.जंजाळे, मिलिंद भैसे यांनी केले. व्यासपीठावर माजी सभापती राजेंद्र पुंडलिक चौधरी, सहाय्यक निरीक्षकभरत चौधरी, माजी सरपंच सुभाष धनगर, गोलू राणे, विजय चांदणे, नाना डेपो चौधरी, माळी समाजाध्यक्ष संजय माळी, धनगर समाजाध्यक्ष शामराव धनगर, सोनार समाज अध्यक्ष राजीव सोनार, तेली समाज अध्यक्ष समाधान चौधरी, कोळी समाज अध्यक्ष रवींद्र सोनवणे, नंदू जोशी, संतोष माळी, योगेश माळी, रमेश पालवे, शालिग्राम डोयसे, फुलगाव उपसरपंच सिध्दांत चौधरी, नामदेव पहेलवान मोरे, छोटू सेवातकार, अनिल वंजारी, सुभाष शेठ पोतदार, भगवान शेठ वंजारी, अनिल वंजारी, गंभीर अण्णा माळी, सुरेश चौधरी, शशी चौधरी, हाजी फहिम शेख, मुस्लिम भाई मोदी, साबीर कुरेशी, डी.के.खाटीक, विलास वंजारी, बळीरामदादा सोनवणे, फझल नूर मोहम्मद, विजय पाटील, वेल्हाळा माजी सरपंच विजय पाटील, अशोक श्रीखंडे, रामभाऊ माळी, शंकर पवार, विजय भोठे, किरण धुंदे, मनीषा पाटील, भाजपा जिल्हा सरचिटणीस वैशाली कुलकर्णी, जैन समाज अध्यक्ष गिरीश जैन, केशव पाटील, संजय धनगर आदींची उपस्थिती होती









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !