यावल ग्रामीण रुग्णालयात शनिवारी ताण-तणाव मुक्त शिबिर


यावल : यावल ग्रामीण रुग्णालयात ताण-तणाव मुक्त, मानसिक आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे. राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम सामान्य रुग्णालय, जळगाव यांच्यातर्फे शनिवार, 16 रोजी सकाळी दहा वाजता शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन रुग्णालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

विविध आजारांची होणार तपासणी
जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम अंतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने यावल ग्रामीण रुग्णालयात शनिवारी सकाळी दहा वाजेला ताण-तणाव मुक्ती, मानसिक आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये मानसोपचार तज्ञ डॉक्टर रुग्णांची तपासणी करतील. शिबिर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.किरण पाटील, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.सुशांत सुपे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.आकाश चौधरी, यावल ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.विजय कुरकुरे यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. या आरोग्य तपासणी शिबिरात एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी अरुण पवार, तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर, गटविकास अधिकारी डॉ.मंजुश्री गायकवाड यांची उपस्थिती राहणार आहे. शिबिरात अति ताण-तणावाची लक्षणे असलेले, शांत झोप न लागणे, एकाग्रता करता न येणे, गोष्टी लक्षात न राहणे, सतत टेन्शन, झोपेचे विकार, व्यसनाधीनता, लहान मुलांचे मनोविकार या संदर्भात तपासणी केली जाणार आहे आणि समुपदेशनदेखील व मोफत औषध उपचार देखील होणार आहे. या शिबिराचा लाभ नागरीकांनी घ्यावा, असे आवाहन ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने करण्यात आले आहे.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !