फैजपूर नगरपालिका हद्दवाढीबाबत हरकतींवर सुनावणी
Hearing on objections regarding extension of Faizpur municipality फैजपूर :नगरपरीषद हद्दवाढ प्रारुप विकास योजना नगरपरीषदेने 19 अॅक्टोबर रोजी प्रसिध्द केली आहे. त्यावर 17 नोव्हेंबरपर्यंत लेखी हरकती व सुचना मागवण्यात आल्यानंतर पालिकेकडे 40 जागा मालकांच्या हरकती प्राप्त झाल्या आहेत. या हरकतींवर संचालक, नगररचना, पुणे यांच्याकडील 17 नोव्हेंबरच्या पत्रान्वये नियुक्त केलेले सेवानिवृत्त सहा.संचालक, सेवानिवृत्त नगररचनाकार विलास पांडुरंग पाटील, अनुज्ञप्तीधारक अभियंता भानुदास लक्ष्म्ण वाणी व वामन लक्ष्मण चौधरी असे तीन तज्ञ व्यक्ती तसेच फैजपूर नगरपरीषदेच्या वतीने देवयानी यादव (आय.ए.एस.) प्रशासक, तथा सहा.जिल्हाधिकारी फैजपूर उपविभाग फैजपूर अशा चार सदस्यांचा नियोजन समितीसमोर नगरपरीषद सभागृहात सुनावणी घेण्यात आली.
दोन सत्रात झाली सुनावणी
ही सुनावणी ही दोन सत्रात पार पडली. 40 जागा मालकांचे म्हणणे समितीने ऐकले तसेच प्राप्त हरकतींवर नियोजन समितीने घेतलेले निर्णय याबाबतचा अहवाल मशासनास सादर केला जाणार आहे व त्यानंतर हद्दवाढ अंतिम विकास योजनेची कार्यवाही करण्यात येणार आहे. सहा.संचालक राजेश पाटील, प्र.मुख्याधिकारी स्वालिहा मालगावे, सहा.नगररचनाकार अंजली माळी, रचना सहाय्यक ऐश्वर्या पिंगळे, नगर अभियंता फारुखी एम.आर, वरीष्ठ लिपिक दिलीप वाघमारे, लिपिक सुहास नेहेते, जगदीश महाजन, प्रसन्ना डोलारे व नरेंद्र बाऊस्कर, शे. अन्वर आदींचें सहकार्य लाभले.







