भुसावळ शहरातील ऑदित्य लॉनसमोरून दुचाकी लांबवली


A bike was parked in front of Auditya Lawn in Bhusawal  भुसावळ : शहरात दुचाकी चोरींचे सत्र कायम आहे. शहरातील आदित्य लॉन समोरून एका व्यावसायिकाची 25 हजार रुपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लांबवली. ही चोरी 6 डिसेंबर रोजी रात्री 8 वाजता झाली. याप्रकरणी बुधवार, 13 डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुचाकी चोरींचे सत्र कायम
संजीव माधव कुरकुरे (52, रा.गंगाराम प्लॉट, भुसावळ) हे आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. खाजगी व्यावसाय करून आपला उदरनिर्वाह करतात. 6 डिसेंबर रोजी रात्री आठ वाजता संजीव कुरकुरे भुसावळ शहरातील आदित्य लॉन येथे त्याची दुचाकी क्रमांक (एम.एच.19 बी.ई .6865) ने आलेले होते. त्यावेळी त्यांनी दुचाकी पार्क केली असता चोरट्यांनी संधी साधून त्यांची दुचाकी लांबवली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर कुरकुरे यांनी दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला परंतू दुचाकी कुठेही मिळून आली नाही. अखेर बुधवार, 13 डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता भुसावळ बाजारपेठ पोलिसात धाव घेवून तक्रार दिल्यानंतर अज्ञात चोरट्यांविरोधात भुसावळ बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार रमण सुरळकर करीत आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !