खान्देश रनमध्ये भुसावळ रनर्सच्या दीपा स्वामी प्रथम
उमेश घुले 21 किमीमध्ये तृतीय : भुसावळ स्पोर्ट्स अॅण्ड रनर्स असोसिएशनतर्फे विजेत्यांचा सत्कार
Deepa Swamy of Bhusawal Runners first in Khandesh Run भुसावळ : जळगाव येथे झालेल्या खान्देश रनमध्ये भुसावळ स्पोर्ट्स अॅण्ड रनर्स असोसिएशनच्या 70 धावपटूंनी 21 किमी, 10 किमी, 5 किमी व 3 किमी या वेगवेगळ्या गटात यशस्वी सहभाग नोंदविला. यावेळी दीपा स्वामी 10 किमीमध्ये महिलांच्या गटात प्रथम ठरल्यात व उमेश घुले 21 किमीमध्ये पुरुषांच्या गटात तृतीय ठरले. 70 धावपटूंपैकी निम्म्याहून अधिक अर्थात 36 धावपटू या महिला होत्या. त्यामुळे जिल्हा पोलिस अधीक्षक एम.राजकुमार व त्यांच्या पत्नी रम्या कन्नन यांनी भुसावळच्या धावपटूंचे व असोसिएशनचे विशेष कौतुक केले.
स्मृतीचिन्ह व पदक देवून सन्मान
नुकताच भुसावळ स्पोर्ट्स अॅण्ड रनर्स असोसिएशनतर्फे विजेत्यांचा भव्य सत्कार आयोजित करण्यात आला. डॉ.नीलिमा नेहेते व डॉ.चारुलता पाटील यांनी दीपा स्वामी यांना पुष्पगुच्छ, स्मृतीचिन्ह व पदक देऊन सन्मानित केले. त्यानंतर असोसिएशनचे प्रमुख प्रा.प्रवीण फालक यांनी उमेश घुले यांना पुष्पगुच्छ, स्मृतीचिन्ह व पदक देऊन सन्मानित केले. यशस्वी स्पर्धकांनी मनोगत व्यक्त केले.


धावपटूंचाही सन्मान
प्रथमच शहराबाहेर मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या एकता भगत, शीला कश्यप, स्वाती भोळे, पुष्पलता चौधरी, गीता नारखेडे, सुनीता वाघमारे, सुनीता सिंग, मंजू शुक्ला, गुंजन गुप्ता, रीना परदेशी, सविता घाटे, मनीषा सिंग, सीमा वायकर, कीर्ती मोटाळकर या महिला धावपटूंना पूनम भंगाळेव स्वाती फालक यांनी पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले. त्याचबरोबर ताराचंद खरारे, डॉ.आशिष राठी या नवोदित धावपटूंचा रणजीत खरारे व प्रवीण वारके यांनी सत्कार केला. खान्देश रनमध्ये अतिशय कमी वेळेत धाव पूर्ण करून चमकदार कामगिरी करणारे तरुण बीरिया, छोटू गवळी, संजय भदाणे, विजय फिरके, संतोष घाडगे, राजेंद्र घाटे, मंगेश चंदन या धावपटूंचा डॉ.तुषार पाटील यांनी सत्कार केला. याशिवाय खान्देश रनच्या आतापर्यंत झालेल्या सातही मॅरेथॉनमध्ये सहभागी झाल्याबद्दल डॉ.नीलिमा नेहेते, सारंग चौधरी, प्रवीण वारके, व प्रवीण पाटील या चारही धावपटूंचा विशेष सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन प्रवीण पाटील यांनी तर आभार प्रा.प्रवीण फालक यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी इसाक गवळी व नीलांबरी शिंदे यांचे सहकार्य लाभले.





