बोदवड तालुक्यातील ग्रामीण भागात रस्ते होणार ‘चकाचक’

सात कोटी 20 लक्ष निधीच्या ग्रामीण मार्ग रस्त्यांना मंजुरी : आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नांना यश


बोदवड : आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नांनी बोदवड तालुक्यातील ग्रामीण भागातील खेड्या-पाड्यांना जोडणार्‍या रस्त्यांच्या मजबुतीकरण, डांबरीकरणासाठी सात कोटी 20 लक्ष रुपये निधी मंजूर झाला आहे.

या रस्त्यांची होणार कामे
मनुर बु.॥ ते शेलवड (90 लक्ष), मनुर बु.॥ ते लोणवाडी (90 लक्ष), मनुर खु र्द ते राउतझिरा (90 लक्ष), धानोरी ते पिंपळगाव खुर्द (90 लक्ष), करंजी ते जुनोनेदिगर (90 लक्ष), सुरवाडे खुर्द ते बोरगाव (90 लक्ष), घाणखेड ते तालुका हद्द (पिंपळखुटा) (90 लक्ष), मानमोडी ते महादेव तांडा (90 लक्ष) असा एकूण प्रत्येकी 90 लक्ष रुपये प्रमाणे सात कोटी 20 लाखांचा निधी मंजूर झाला आहे.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !