आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुकीत मनसे ताकद दाखवणार : जिल्हा उपाध्यक्ष विनोद पाठक


MNS will show its strength in upcoming Lok Sabha-Vidhana Sabha elections: District Vice President Vinod Pathak भुसावळ : आगामी लोकसभा, विधानसभा तसेच पालिकेच्या स्थानिक निवडणुकीत पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या नेतृत्वात पक्ष पूर्णपणे ताकदिने आपले उमेदवार उभे करणार असून सर्व निवडणुकांना पक्ष सामोरे जाईल त्यासाठी कार्यकर्त्यांनी नागरीकांच्या गाठीभेटी वाढवाव्यात तसेच त्यांच्या अडी-अडचणी समजून घेवून कामाला लागावे, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद पाठक यांनी येथे केले. मनसेची भुसावळ शहर व तालुका पदाधिकार्‍यांची बैठक नुकतीच झाली. त्यात विनोद पाठक यांनी पदाधिकार्‍यांना मार्गदर्शन केले.

पक्ष संघटना वाढीवरही चर्चा
विनोद पाठक यावेळी मार्गदर्शन करताना म्हणाले की, स्थानिक नागरीकांचे जे काही प्रश्न वा अडी-अडचणी असतील ते शासनाकडे पक्षातर्फे ताकदीने मांडण्यात येतील तसेच नागरीकांना न्याय मिळवून देण्यात येईल. पक्ष संघटना अधिक कशा प्रमारे बळकट करण्यात येईल, यावरही चर्चा करण्यात आली. प्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष विनोद पाठक, तालुकाध्यक्ष (वाहतूक) दीपक सोनवणे, तालुका सचिव विलास कोळी, गट अध्यक्ष दशरथ सपकाळे, नीलेश पाटील, तुषार वाढे, सुनील तायडे, तुषार कोळी, महेंद्र ब्राह्मणे, सय्यद आदील, गणपत चौधरी, शिवा वाढे इत्यादी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !