मुक्ताईनगरात 15 रोजी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा


मुक्ताईनगर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुक्ताईनगरातील एस.एम.कॉलेजलगतच्या प्रशस्त आठ एकराच्या मैदानावर शनिवार, 15 रोजी शेतकरी मेळावा होत आहे. या मेळाव्यात शेतकरी हिताच्या दृष्टीने मुख्यमंत्री मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. या मेळाव्यास माजी केंद्रीय कृषी मंत्री तथा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, कृषी मंत्री दादासाहेब भुसे, दिलीप वळसे-पाटील, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. मेळाव्याच्या दृष्टीने आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांतर्फे तयारीला वेग देण्यात आला आहे.

अपर पोलिस अधीक्षकांकडून पाहणी
सोमवारी जळगाव अपर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांनी भेट देत मेळावा स्थळासह हेलिपॅड जागेची पाहणी केली. सुरक्षिततेच्या दृष्टीने काही सूचना केल्या आहेत. प्रसंगी आमदार चंद्रकांत पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी सुरेश जाधव, पोलिस निरीक्षक सुरेश शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता नेहते, सहाय्यक अभियंता पाटील, उप अभियंता एल.सी.सावखेडकर, विधानसभा क्षेत्रप्रमुख सुनील पाटील, तालुकाप्रमुख छोटू भोई, जिल्हा नियोजन समिती सदस्य अ‍ॅड.मनोहर खैरनार, अल्पसंख्यांक जिल्हा संघटक अफसर खान, माजी उपजिल्हा प्रमुख गोपाळ सोनवणे, उपतालुका प्रमुख प्रफुल्ल पाटील, शहर प्रमुख प्रशांत टोंगे, माजी उपतालुका प्रमुख बाळा भालशंकर, माजी उपसरपंच मुशीर मणियार, जाफर अली, ग्रामपंचायतीचे माजी सदस्य हारून शेख, विधानसभा संघटक अमरादीप पाटील, शकील शेख, जहीर शेख, सलीम खान, दिलीप चोपडे, कलाम मणियार, सुभाष पाटील (टेलर), माजी युवासेना तालुका प्रमुख पिंटू पाटील, गटनेता राजेंद्र हिवराळे, नगरसेवक संतोष मराठे, शुभम तळेले, संतोष कोळी, स्विय सहाय्यक प्रवीण चौधरी, शुभम शर्मा, दीपक पवार, सुधीर कुलकर्णी, पंकज पांडव तसेच असंख्य शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !