गिरडगाव-वाघोदा दरम्यान दुचाकी अपघात : चितोड्यातील तरुण गंभीर जखमी


यावल : यावल-चोपडा रस्त्यावरील गिरडगाव ते वाघोदा दरम्यान असलेल्या डांबर फॅक्टरीच्या समोर रस्त्यावर लावलेले डांबर मशीन समोरील वाहनाच्या प्रकाशाने न दिसल्याने दुचाकीची त्यास मागून धडक झाल्याने अपघातात 32 वर्षीय तरूण गंभीर जखमी झाला. हा अपघात शनिवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारात घडला. जखमीवर यावल ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून त्यास जळगावी हलवण्यात आले.

तरुणाची प्रकृती गंभीर
यावल-चोेपडा रस्त्यावर गिरडगाव ते वाघोदा दरम्यान डांबरची फॅक्टरी आहे या फॅक्टरीच्या समोरील रस्त्यावर डांबरचे मशीन हे रस्त्यातर लावले होते. शनिवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास दुचाकी (क्रमांक एम.एच.19 बी. एन.5104) द्वारे कुणाल पाटील (32, चितोडा, ता.यावल) हा तरुण यावलकडे येत असताना अंधार पडल्याने समोरील वाहनाच्या प्रकाशात रस्त्यावरील डांबरचे मशीन न दिसल्याने दुचाकी मागूनच या मशीनला धडकली. या अपघातामध्ये कुणाल पाटील यांच्या डाव्या हाताला जबर दुखापत झाली. अपघात स्थळावरून तरुणाला प्रथम उपचाराकरीता यावल ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आलेे येथे प्रथमोपचार करून त्यांना जळगाव हलवण्यात आले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !