ब्रम्हलीन गुरु जगन्नाथ महाराजांचे कार्य अलौकिक : राधे राधे बाबा
फैजपूरात सदगुरु ब्र.जगन्नाथ महाराज पुण्यतिथी सोहळ्यात विविध कार्यक्रम
Bramhleen Guru Jagannath Maharaj’s Work Supernatural : Radhe Radhe Baba फैजपूर : सतपंथ मंदिर संस्थानचे अकरावे गादीपती ब्रम्हलीन गुरु जगन्नाथ महाराज यांचे कार्य अलौकिक होते. सतपंथासाठी त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत मनापासून कार्य सुरू ठेवले. त्यांचा कृपाप्रसाद म्हणून गुरूंचे स्वप्न साकार करणारे महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज यांच्यारूपाने अनमोल रत्न मिळाले आहे. त्याचे फळ नक्कीच आपल्यालाही काही अंशी प्राप्त होईल, असे विचार अखिल भारतीय संत समितीचे राष्ट्रीय संयुक्त महामंत्री स्वामी मनमोहन दासजी उर्फ राधे राधे बाबा यांनी येथे व्यक्त केले. सतपंथ मंदिर संस्थानचे गुरु जगन्नाथ महाराज यांच्या 22 व्या पुण्यतिथी निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यांची धर्म पीठावर उपस्थिती
यावेळी धर्मपीठावर अखिल भारतीय संत समिती महामंत्री राधे राधे बाबा, अ.भा.सं.स.महाराष्ट्र अध्यक्ष प.पू.गोपाल चैतन्यजी बाबा, म.प्र.प्रदेश महामंत्री तथा प्रवक्ता हनुमान दासजी महाराज, स्वामी अखिलानंदजी महाराज, अवघेश शास्त्री महाराज, हभप रवींद्र महाराज हरणे, खानदेश रत्न कोठारी शास्त्री भक्ती किशोरदासजी महाराज, प.पू.श्याम चैतन्यजी महाराज, स्वरूपानंदजी महाराज, पवनदासजी महाराज, कन्हैयाजी महाराज, श्रीकांत रत्नपारखी, डॉ.आचार्य सचिनजी, हभप रवींद्र महाराज महाले, स्वामी बलराम दासजी, हरीश चैतन्यजी महाराज, प.पू.शकुंतला दीदी, मीरा दीदी, हभप नितीन महाराज, हभप गणेश महाराज यांच्यासह अमेरिकेहून आलेले विठ्ठलभाई पटेल, सरोजबहन, वर्षा बहन, डॉ.कुंदन फेगडे, पांडूरंग सराफ, जफर भाई, बाबू शेठ, मुखी गण, हजारो भाविक भक्त उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते वेगवेगळ्या दानशूर परिवारांचा सत्कार करण्यात आला.


महामंडलेश्वरांनी गुरू चरणी सेवा केली अर्पण
मुक्ताई संस्थांचे हभप रवींद्र महाराज हरणे यांनी सांगितले की, सर्व पंथांना एकत्रित आणून धर्माचा प्रचार करणारे महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी तन, मन, सेवा गुरूंच्या चरणी अर्पण केल्याचे फळ आपणा सर्वांना मिळत आहे. हे आपल्या भागाचे सौभाग्य आहे. या कार्यक्रमाचे विशेष म्हणजे नायगव्हाण येथील श्री सद्गुरू गुरुकुल वारकरी शिक्षण संस्था या गुरुकुल मधील आलेले दोनशे विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक करावे तेवढे कमी असून त्या संस्थेचे कार्य करणारे हभप रवींद्र महाराज महाले यांचे सर्व संत मंडळींनी विशेष अभिनंदन व कौतुक केले. सतपंथ चॅरिटेबल ट्रस्टतर्फे या संस्थेला एक लाख रुपयांची भरीव मदत उपस्थित संतांच्या हस्ते देण्यात आली. आचार्य डॉ.सचिन पाटील यांनी सतपंथ चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तुलसी हेल्थ केअर सेंटर विषयी माहिती दिली. प्रस्तावनेत महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज यांनी श्री सतपंथ मंदिर संस्थान तथा सथपंथ चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत राबविले जाणारे सर्व सेवाभावी कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली. मी भव्यदिव्य कार्य करू शकतो ते माझ्या विश्वासू कार्यकर्त्यांमुळेच. शैलेश यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.





